RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

शारदीय नवरात्रौत्सवास सुरुवात, राज्यभरातील मंदिरं सजली

10 October 2018 at 14:39

मुंबई : आज घटस्थापना, नवरात्रीचा पहिला दिवस. त्यानिमित्त राज्यभरातील देवीच्या मंदिरात भक्तांची गर्दी पाहायला मिळते. सर्व मंदिरं आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांनी सजवण्यात आली आहेत. कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर आणि तुळजापूरचं तुळजाभवानी मंदिरालाही आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.  तिकडं पंढरपुरात रुक्मिणी मातेच्या मंदिरात विशेष सजावट करण्यात आली आहे.

तुळजाभवानी मंदिर केवळ दीड तास बंद

नवरात्रोत्सवाच्या कालावधीत प्रत्येक भाविकाला गेल्या वर्षीपासून प्रवेश पास बंधनकारक करण्यात आला आहे. त्यानुसार मागील वर्षी पास घेऊन घटस्थापना ते अश्विनी पौर्णिमा या कालावधीत नऊ लाख 86 हजार भाविकांनी दर्शन घेतले होते. यंदा भाविकांच्या संख्येत होणारी वाढ ध्यानात घेऊन मंदिर प्रशासनाने केवळ दीड तास मंदिराचे दरवाजे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दर तासाला सहा हजार भाविकांचे दर्शन होईल, अशी व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली असल्याची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी दिली.

अंबाबाई मंदिरात जय्यत तयारी

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. यंदाच्या नवरात्रोत्सवात मंदिर परिसरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असेल. या नवरात्रोत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलिस फाटा तैनात करण्यात आलेला आहे. तर या संपूर्ण उत्सवावर 50 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे.

हिंगोलीत ऐतिहासिक दसरा महोत्सव

हिंगोली येथे  164 वर्ष जुने असलेल्या ऐतिहासिक दसरा महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. खाकी बाबा मठाचे संत मानदास  बाबा यांनी 1853 मध्ये दसरा महोत्सवाची सुरुवात केली होती. हिंगोली शहरातील जलेश्वर मंदिर येथे आकाशवाणी या कार्यक्रमाने दसऱ्याच्या औपचारिक सुरुवात झाली. रावणाच्या अत्याचाराने भूतलावर नागरिक त्रस्त झाले होते. भगवान नारायणाने आकाशवाणीकरुन मी अयोध्येत जन्म  घेऊन रावणाच्या त्रासापासून सर्वांची सुटका करणार अशी आकाशवाणी केल्याची अख्यायिका आहे. त्याच आकाशवाणीचे कार्यक्रम रामलीलाचे कलाकार यांनी सादर केले. पुढील 11 दिवस हिंगोली येथे दसरा महोत्सवानिमित्त रामलीला मैदान येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेमुळे शेतकऱ्यांना वीजजोडणी मिळणार

शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याऱ्या मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतील लाभार्थ्यांना त्यांच्या हिस्याची भरावी लागणारी रक्कम आता कमी करण्यात आली आहे.

16 hours before