कराड : सातबारावरील मयत खातेदाराची एकत्र कुटुंब मॅनेजर नोंद कमी करून वारसदारांची नावे नोंद करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या कराड तालुक्यातील किवळच्या तलाठी शमशाद सलीम शेख (राहणार जुनी पेठ, कटापूर रोड ता. कोरेगाव जि.सातारा) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कोतवालाच्या घरात सापळा रचून रंगहाथ पकडले. याप्रकरणी तलाठी शमशाद शेख यांच्यावर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे, सातबारा खाते उताऱ्यावर मयत व्यक्तीचे एकत्र कुटुंब मॅनेजर असलेली नोंद कमी करून इतर हक्कात असलेल्या वारसदार बहिणी व भावांची नावे भोगवटदार म्हणून नोंद करण्यासाठी तलाठी शमशाद शेख यांनी पाच हजार रुपयांची लाच मागितली असल्याचा तक्रार किवळ येथील व्यक्तीने लाचलुचपत विभाग सातारा यांच्याकडे शुक्रवारी केला होता. या अर्जाची पडताळणी करून लाचलुचपत विभागाच्या सातारा पोलीस उपाधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आरिफा मुल्ला, सहायक फौजदार जयंत कुलकर्णी, आनंद सपकाळ, भरत शिंदे, संजय साळुंखे, अजित कर्णे, विनोद राजे, प्रशांत ताटे, संजय अडसूळस महिला पोलीस श्रद्धा माने यांनी सरकारी पंचा समक्ष किवळ येथे सापळा रचून शमशाद शेख यांना किवळ सज्जाचे कोतवाल यांच्या राहत्या घरात पाच हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.याप्रकरणी घटनास्थळाचा रीतसर पंचनामा करून तलाठी शेख यांच्या विरोधात उंब्रज पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये पाच हजार रुपये लाच स्वीकारल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दरम्यान, नागरिकांची कामे करण्यासाठी लोकसेवकांकडून कसल्याही प्रकारची लाच किंवा अन्य काही मागणी झाल्यास लाचलुचपत विभागाकडे तक्रार करावी. संपर्कासाठी पोलीस उपाधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जिल्हा कोषागार कार्यालय जवळ सदर बाजार सातारा येथे समक्ष हात व कार्यालयीन दूरध्वनी 021 62 238139 या तसेच हेल्पलाईन क्रमांक 10 64 व्हाट्सअप नंबर 78 75 333333 या क्रमांकावर संपर्क साधावा असे असे आव्हान लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक अशोक शिर्के यांनी केले आहे.
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |