11:00pm | Jun 20, 2018 |
सातारा : यंदाच्या गणेशोत्सवात गणेशमूर्तींचे विसर्जन पोलीस मुख्यालयाच्या पिछाडीस असणार्या पोलीस वसाहतीमधील ब्रिटीशकालीन रिसालदाराच्या तळ्यात होणार आहे. आज संध्याकाळी या तलावाची पाहणी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांच्यासह पालिकेच्या पदाधिकार्यांनी केली.
सातार्यात दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो. छोटी-मोठी पकडून अशी शेकडोंच्या घरात गणेश मंडळे आहेत. या मंडळांमध्ये भव्यदिव्य आकाराच्या गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते. परंतू एवढ्या भव्य आकाराच्या गणेश मूर्तींचे विसर्जन कसे करावे, असा प्रश्न सातारा पालिकेला दरवर्षीच पडलेला असतो. मंगळवार तळे, फुटका तलाव, मोती तळे, साखरी तळे, महादरे ही इतिहासकालीन तळी सातार्यात अस्तित्वात आहेत. मात्र कचरा, निर्माल्य या तलावांमध्ये टाकले जात असल्याने या तलावांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदूषण झाले होते. यापूर्वी या तलावांमध्येच गणेश मूर्तींचे विसर्जन केले जात होते. मात्र अलिकडे प्रदुषणाच्या मुद्यामुळे या तलावांमध्ये मूर्ती विसर्जन बंद करुन नगरपालिका तलाव व प्रतापसिंह शेती फार्म येथील कृत्रिम तळ्यात दरवर्षी गणेश मूर्तींच्या विसर्जनाची सोय केली होती. मात्र कृत्रिम तलावाचे काम दरवर्षी जिकिरीचे ठरत आहे. तसेच या सर्व कामासाठी 40 ते 50 लाख रुपयांचा खर्च पालिकेला सोसावा लागतो. त्यामुळे यावर्षी कृत्रिम तळ्याऐवजी सातारा पोलिस मुख्यालयाच्या पिछाडीस असणार्या वसाहतीमधील ब्रिटीशकालीन रिसालदाराच्या तळ्यामध्ये यावर्षीचे गणेश विसर्जन करण्यात येणार आहे. याबाबत खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी पुढाकार घेवून आज संध्याकाळी जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील व पालिकेच्या पदाधिकार्यांनी या रिसालदाराच्या तलावाची पाहणी केली तसेच यासंदर्भात खा. उदयनराजे भोसले व पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी गणेश मूर्ती विसर्जनाच्या अनुषंगाने पालिका पदाधिकार्यांना सूचना केल्या. तसेच गणेश विसर्जनानंतर या तळ्याची तात्काळ स्वच्छता केली जाणार असल्याची माहिती सातारा पालिकेचे उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी सातारा टुडे शी बोलताना दिली.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |