सातारा : खाजगी व शासकीय कार्यालयात 24 तास सुरक्षेची जबाबदारी पार पाडणारे सुरक्षा रक्षक मात्र आपल्या न्यायाच्या संरक्षणासाठी अन्याय सहन करीत आहेत. या सुरक्षा रक्षकांच्या न्यायासाठी स्व. नामदेवराव घाडगे सुरक्षा रक्षक अँड जनरल कामगार संघाच्या वतीने सुरक्षा रक्षकांच्या वेतनवाढीसाठी संघाचे संस्थापक डॉ. दिलीप येळगांवकर यांनी सांगलीतील अधिकार्यांना सातारा येथे झालेल्या बैठकीत दूरध्वनीवरुन चांगलेच ‘इंजेक्शन’ दिले. त्यामुळे सुरक्षा रक्षकांना ऐन मराठी वर्षारंभाला वेतन भेट म्हणून मिळणार आहे. यामुळे सुरक्षा रक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
महाराष्ट्र राज्याच्या कामगार विभागाने सुरक्षा रक्षक बोर्ड निर्माण केले आहे. या बोर्डाचे कार्यालय सातारा जिल्ह्यात नसल्यामुळे सुमारे तीन ते चार हजार कामगारांना स्वत:चे हजेरी पुस्तक घेवून सांगलीला जावे लागत होते. काहीठिकाणी म्हणजे पुण्यामध्ये सुरक्षा रक्षकांचे वेतन काढण्यासाठी दोन टक्के कपात केली जात होती. त्यानंतर डिमांड ड्राफ्ट (डीडी) दिला जात होता. याबाबत स्वत: डॉ. दिलीप येळगांवकर व सुरक्षा रक्षक संघ, संघटनेचे अध्यक्ष अभिजीत येळगांवकर, सचिव रमेश जाधव, सदस्य ऍड. विकास आंबेकर यांनी कामगार कायद्याचा अभ्यास करुन स्व. नामदेवराव घाडगे सुरक्षा रक्षक संघटनेची स्थापना केली. त्यामुळे या संघटनेच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील सुमारे 150 कामगारांच्या समस्या झपाट्याने सुटू लागल्या आहेत. किमान वेतन, आरोग्याची हमी, गणवेश, सुरक्षेसाठी हलके शस्त्र व इतर सोयी-सुविधा या मागण्यांसाठी लवकरच मंत्रालयात कामगार मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या समवेत बैठक होणार आहे. सध्या खाजगी सुरक्षा रक्षकांचे पेव फुटले असून धडधाकट सुरक्षा रक्षकांना वेठबिगारासारखे वेतन दिले जाते. हे ‘कमिशन राज’ बंद करण्यासाठी भविष्यात मोठा संघर्ष करावा लागणार आहे, असेही सातारा येथील झालेल्या बैठकीत डॉ. येळगांवकरांनी सूचित केले.
शासकीय कार्यालयामध्ये सुरक्षा रक्षक बोर्डाच्या शिफारशीनुसार सुरक्षा रक्षक नेमण्यात यावेत, असा शासकीय आदेश आहे. हा आदेश डावलून हा आदेश सातारा जिल्हा परिषद तसेच इतर कार्यालयात कमिशन राजमुळे बेरोजगारांवर अन्याय केला जात आहे. खाजगी सुरक्षा रक्षक पुरवठा करणार्या ठेकेदारांना पोसण्याचे काम राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या अनेक कार्यालयात दिसून येत आहे. या अन्यायाविरोधात सुरक्षा रक्षकच रस्त्यावर उतरणार आहेत व राजकीय हल्लाबोल करणार्यांना लवकरच धडा शिकवला जाईल, असेही डॉ. येळगांवकर यांनी स्पष्ट केले. सुरक्षा रक्षकांना अधिक वेळेचे वेतन मिळावे तसेच सुरक्षा रक्षक बोर्डात सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्यांना कामावर न घेता नवीन भरती करावी, या मागणीचाही पाठपुरावा करण्यात येणार आहे. या बैठकीला सामाजिक कार्यकर्ते मदन खंकाळ, संदीप कुलकर्णी, अजित जगताप व सुरक्षा रक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |