02:28am | Nov 19, 2019 |
कराड : कोल्हापूर नाक्यावर कोल्हापूर-पुणे लेनवर उड्डाण पूल नसल्याने होणार्या अपघातानंतरही प्रशासन आणि महामार्ग प्राधिकरणाकडून कोणतीच हालचाल होत नसल्याने कराडकर नागरिक आक्रमक झाले आहेत. सर्व पक्षीय नागरिकांनी एकत्र येत कोल्हापूर नाका परिसरात दोन्ही लेनवर उड्डाण पुल व्हावेत अशी मागणी करत सध्यस्थितीत पुणे .कोल्हापूर लेनवर त्वरीत दुहेरी वाहतूक सुरु झालीच पाहिजे अशी भूमिका कराडकर नागरिकांनी घेतली आहे. सर्वपक्षीय कृती समिती कोणत्याही नेतृत्वाशिवाय कार्यरत राहणार असून सर्व नागरिकांनी या लढयात सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी कोल्हापूर नाका परिसरात झालेल्या अपघातात एका चिमुकलीचा जीव गेला होता. तत्पूर्वी मागील अडीच वर्षात सुमारे 15 ते 16 नागरिकांचा बळी गेला आहे. कोल्हापूर नाका परिसरात दुसरा उड्डाण पूलही 2017 सालीच मंजूर झाला आहे. मात्र तरीही आजवर या पुलाचे काम सुरु झालेले नाही, त्यामुळे प्रशासन, रस्ते विकास महामंडळ आणि महामार्ग प्राधिकरण या अपघातांना जबाबदार असल्याची भावना सर्वसामान्य कराडकर नागरिकांसह तालुक्यातील नागरिकांमध्ये आहे. या पार्श्वभूमीवर विश्रामगृहात नागरिकांची सर्वपक्षीय बैठक झाली. कोल्हापूर नाक्यावरील अवैध वडाप थांबे, मनमानी पार्किंग यावर कराड पोलिसांनी कारवाई केलीच पाहिजे अशी एकमुखी मागणी केली. तसेच सध्यस्थितीत अपघात टाळण्यासाठी कोल्हापूर नाक्यावरील उड्डाण पुलावरुन दुहेरी वाहतूक सुरु झाली पाहिजे, अशी मागणी केली.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |