02:02am | Oct 15, 2019 |
कराड : मलकापूरच्या माळावर माझा भ्रष्टाचार उभा असल्याची कबुली देणार्या आमच्या चुलत्यांच्या घरातल्या नेत्याचे नेतृत्व स्वीकारणार का? असा सवाल करत आपल्या सर्वांच्या आपुलकीच्या नात्यांमधील व स्वच्छ चारित्र्य असलेल्या पृथ्वीराज चव्हाण व श्रीनिवास पाटील यांनी कधी नाकाला रुमाल लावलेला नाही. सर्वसामान्यांच्या हातात हात द्यायला ते दोघे कधीच मागे-पुढे पहात नाहीत. अशा नेत्यांना भरघोस मतांनी निवडून द्या. असे आवाहन भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्रजीत मोहिते यांनी केले.
कराड दक्षिण विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सवादे (ता. कराड) येधील जाहीर सभेत ते बोलत होते. आ. पृथ्वीराज चव्हाण, कृष्णेचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. इंद्रजीत मोहिते म्हणाले, समाजाच्या पाठबळावर निर्माण झालेले पृथ्वीराजबाबा व श्रीनिवास पाटील हे युगपुरुष तुमच्या मदतीला कायम आहेत. कॉंग्रेसने आपल्या पक्षातील सर्वांना प्रेमाची वागणूक दिली. पण त्यांनी याचा फायदा घेऊन डाव्या पंगतीला ते जेवण्यास बसले. तेच नेते भाजपमध्ये गेले आहेत. यशवंतराव मोहिते यांनी पुण्याच्या शनिवार वाड्यासमोर उभे राहून जातीयवादी पक्षाविरूद्ध थेट हल्ला चढवला होता. याच यशवंतराव मोहितेंच्या घरात मी सोडून सर्वांनी त्यांच्या विचारांना तिलांजली दिली आहे. कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट उभा करताना खोटे बोलून स्वतःची इस्टेट निर्माण केली. आमच्या चुलत्यांनी हे मान्य करून मलकापूरच्या माळावर भ्रष्ट कारभार उभा आहे, हे त्यांनी जाहीर सभेत कबूल केले होते. स्वकेंद्रीत, स्वार्थी विचाराने आमच्या घरातील लोकं झपाटले आहेत.
अविनाश मोहिते म्हणाले, पृथ्वीराजबाबा व अतुल भोसले यांची तुलना होऊ शकत नाही? अतुल भोसले हे टाटा डॉक्टरांनी पेपर सोडवल्यामुळे पास झाले आहेत. त्यांना सर्वसामान्यांना भेटण्यासाठी चार ते पाच तास लागतात. त्यांनी रेठर्यात 35 कोटींचा निधी आणला असता तर दुसरे रेठरे उभे राहिले असते. आजपर्यंत दुसर्याचा पाळणा हलवणार्या भोसलेंचे नशीब त्यांना कृष्णा कारखाना मलकापूरला हलवता येत नाही.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, कराड दक्षिणमध्ये झालेला विकास आजपर्यंत कधी झाला नाही. इतका विकास महाराष्ट्रात कुठे झालेला नाही, हा माझा दावा आहे. यशवंतराव मोहिते यांनी विरोधी पक्षात राहून कृष्णा कारखाना मंजूर करून आणला. सभासदांच्या आरोग्यासाठी ट्रस्टची मंजुरी आणली. पण तोही त्यांनी खाजगी केला. अजितराव पाटील-चिखलीकर यांच्यासह मान्यवरांची भाषणे झाली. यावेळी जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप, पैलवान नानासाहेब पाटील, जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले, राजेंद्र चव्हाण, नरेंद्र नांगरे-पाटील, शिवाजीराव मोहिते यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |