सातारा : वॉटर कप स्पर्धांच्या अनुषंगाने कोरेगाव तालुक्यात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत. गेल्या काही वर्षांपासून वॉटर कप स्पर्धेमुळे महाराष्ट्रातील अनेक दुष्काळी गावे पाणीदार झाली आहेत. लोकसहभागातून श्रमदानाची ही किमया होती. गेल्या काही महिन्यांपासून पिंपोडे परिसरामध्ये प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे. समाजसेवेसाठी नेहमीच ओळखल्या जाणार्या अक्षयकुमारने पिंपोडे बुद्रुक, ता. कोरेगाव येथे सुरु असलेल्या वॉटर कप स्पर्धेच्या कामासाठी हातभार लागावा यासाठी तब्बल पंचवीस लाख रुपयांचा चेक देवून जलसंधारणाच्या कामाला बळ दिले आहे.
सध्या राज्यभरात वॉटर कप स्पर्धांच्या अनुषंगाने जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत. कोरेगाव तालुक्यातील सुमारे 41 गावांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे. उत्तर कोरेगावमध्ये सुमारे 40 गावे कायम दुष्काळी म्हणून ओळखली जातात. बाजूनेच वसना, वांगणा ही महत्त्वाकांक्षी योजना जाते. परंतू या योजनेचा कसल्याच प्रकारचा फायदा या गावांना होत नाही. वॉटर कप स्पर्धेच्या अनुषंगाने या दुष्काळी गावांनी आता पाणीदार होण्यासाठी कंबर कसली आहे. स्पर्धेत पात्र ठरण्यासाठी सुमारे 5 लाख 40 हजार घनमीटरचे काम करावे लागणार आहे. त्यामधील 5 लाख घनमीटर हे यंत्राच्या सहाय्याने, तर 40 हजार घनमीटरचे काम श्रमदानातून करावे लागणार आहे. शासनाकडून या कामांसाठी एक छदामसुद्धा देण्यात आलेला नाही. असे असताना पिंपोडे बुद्रुककरांनी लोकसहभागातून व श्रमदानातून सुमारे 30 टक्के जलसंधारणाचे काम पूर्ण केले आहे.
बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता अक्षय कुमार याच्या ‘केसरी’ या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण पिंपोडे परिसरामध्ये सुरु होते. पिंपोडे बुद्रुकमध्ये सुरु असलेल्या वॉटर कप स्पर्धेची माहिती अक्षय कुमारला समजल्यानंतर अक्षय कुमारनेही पिंपोडे येथे जावून श्रमदान केले. एवढ्यावरच न थांबता अक्षयने तब्बल 25 लाख रुपयांचा धनादेश पिंपोडे बुद्रुक येथील छत्रपती शिवाजी महाराज पाणी फौंडेशन समितीला सुपूर्द केला. यावेळी पिंपोडे बुद्रुकचे सरपंच नैनेश कांबळे यांच्यासह पाणी फौंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. अक्षय कुमारच्या या आर्थिक मदतीमुळे पिंपोडेकरांच्या श्रमाला आर्थिक पाठबळ मिळाले आहे. त्यामुळे या भागात नवीन जलक्रांती पर्वाची सुरुवात झालेली आहे.
वाठार स्टेशन, पिंपोडे बुद्रुक, सोनके, तडवळे संमत वाघोली, तळिये, वाघोली, सर्कलवाडी, सोळशी या गावांमध्ये उन्हाळ्यात पाण्याचे मोठ्या प्रमाणावर दुर्भिक्ष्य असते. या अडचणीवर मात करण्यासाठी पाणी अडवा, पाणी जिरवा व विहिरींच्या पाण्याची पातळी वाढवा, हे सूत्र अवलंबून पिंपोडे बुद्रुककरांनी वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून एक पाऊल पुढे टाकलेले आहे. ही जलक्रांती केवळ वॉटर कप स्पर्धेपुरतीच मर्यादित न राहता, ती चिरकाल टिकावी व गावाचा दुष्काळ कायमचा हद्दपार करावा, यासाठी पिंपोडे बुद्रुककर सरसावले आहेत. लोकसहभाग आणि श्रमदानातून 30 टक्के जलसंधारणाचे काम पूर्ण झालेले आहे. उर्वरित कामांसाठी अभिनेता अक्षय कुमारने 25 लाखांचा निधी छत्रपती शिवाजी महाराज पाणी फौंडेशन समितीला सुपूर्द केला आहे. यामुळे या जलसंधारणाच्या कामाला गती मिळाली आहे. पडद्यावरील हिरो हे केवळ पडद्यावरचे हिरो न राहता ते जनमाणसांतही आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून आपली छाप सोडत असतात, हे अक्षय कुमारने पिंपोडे बुद्रुककरांसह राज्याला दाखवून दिले आहे. पिंपाडे बुद्रुकमधील पिण्याच्या पाण्याचा व शेतीचा प्रश्न या निमित्ताने मार्गी लागला आहे. सुजलाम सुफलाम् भविष्यासाठी पिंपोडेकरांना आता झगडावे लागणार नाही. अभिनेता अक्षय कुमारच्या या दातृत्वामुळे पिंपोडे बुद्रुकचे रुपडे मात्र पलटणार आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |