RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

काश्मीर : पाच दहशतवाद्यांना घेरले, १ ठार

29 May 2019 at 14:58

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या कुलगाम येथे पहाटे सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे. सुरक्षा दलाच्या जवानांनी ५ दहशतवाद्यांना घेरले असून चकमक सुरूच असल्याचे वृत्त आहे. 

कुलगाममधील ताजिपोरा येथे काही दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली. ही माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसोबत सीआरपीएफच्या जवानांनी परिसरात तत्काळ शोध मोहीम हाती घेतली. दरम्यान, दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. जवानांनीही त्यांना चोख उत्तर देणे सुरू केले. 

मंगळवारी अनंतनाग जिल्ह्यातील जंगलात चकमकीत एका पाकिस्तानी नागरिकासह 'जैश-ए-मोहम्मद'चे दोन दहशतवादी ठार झाले होते. जिल्ह्यातील कोकरनागच्या कचवान वनक्षेत्रात दहशतवादी लपल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलाने शोध मोहीम हाती घेतली होती. 

पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याच्या संशयावरून मंगळवारी दोघांना रतनुचक लष्करी तळाजवळच्या परिमंडळ केंद्राजवळून तर एकाला लष्करी छावणीजवळ ताब्यात घेतले आहे. यां पैकी दोघे लष्करी छावणीबाहेर छायाचित्र काढताना, तसेच चित्रिकरण करताना आढळलेल होते. या संशयित हेरांना पोलिसांच्या हवाली करण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे. 


माजी केंद्रीय अर्थमंत्री, ज्येष्ठ भाजप नेते अरुण जेटली यांचे निधन

माजी केंद्रीय अर्थमंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते, प्रसिद्ध वकील अरुण जेटली यांचे आज प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते ६६ वर्षांचे होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जेटली यांच्या निधनाने अत्यंत अभ्यासू आणि उत्कृष्ट संसदपटूला देश

24 August 2019 at 16:23

अखेर चिदंबरम अटकेत

आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणात माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना अखेर बुधवारी दिवसभराच्या नाट्यपूर्ण घडामोडींनंतर रात्री दहा वाजता सीबीआयने अटक केली. अटक टाळण्यासाठी चिदंबरम यांनी दिवसभर प्रयत्न केले.

22 August 2019 at 14:18