मुंबई : ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांचे मुंबईतील सुजय रुग्णालयात निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. फुफ्फुसाच्या संसर्गामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, सोमवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
खय्याम यांचा जन्म १८ फेब्रुवारी १९२७ साली पाकिस्तानमधील पंजाबमध्ये झाला. १९५३ मध्ये अभिनेत्री नर्गिस दत्त यांची आई जद्दनबाई यांच्या शिफारशीमुळे त्यांना ‘फूटपाथ’ हा चित्रपट मिळाला. या चित्रपटाच्या वेळी लेखक झिया सरहदी यांनी त्यांना ‘खय्याम’ या नावाने कारकिर्दीला नव्याने सुरुवात करण्याचे सुचविले. त्यानंतर ते खय्याम याच नावाने ओळखले जाऊ लागले. याच नावाने त्यांनी अनेक चित्रपटांना संगीत दिले. अभिनेता होण्यासाठी मुंबईत आलेल्या खय्याम यांनी संगीतकार म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत आपली ओळख निर्माण केली. त्यांनी कारकिर्दीत पन्नास हिंदी चित्रपटांना संगीत दिले.
खय्याम यांना ‘उमराव जान’ चित्रपटासाठी सर्वोत्तम संगीतकाराचा फिल्मफेअर आणि राष्ट्रीय पारितोषिक मिळाले होते. ‘कभी -कभी’ चित्रपटासाठीही त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. खय्याम यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कारही मिळाला होता.
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |

विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |