उंब्रज : घरातील नळाला इलेक्ट्रिक मोटार जोडत असताना शॉक लागून सुट्टीवर आलेले लष्करी जवान अमोल कृष्णात माने (वय 29) यांचा बुधवारी सकाळी दुर्दैवी मृत्यू झाला. चरेगाव (ता. कराड) येथे ही घटना घडली असून जम्मू-काश्मीर येथील श्रीनगरमध्ये सैन्य दलाच्या 13 रेजिमेंट राष्ट्रीय रायफल विभागात ते कार्यरत होते.
दहा वर्षांपूर्वी अमोल माने हे लष्करात भर्ती झाले होते. 22 मे रोजी एक महिन्याची सुट्टी काढून ते गावी आले होते. माने यांच्या घराच्या नळाला मोटार जोडून पाणी भरले जात असे.त्यामुळे बुधवारी सकाळी अमोल माने नेहमीप्रमाणे इलेक्ट्रिक मोटार जोडत होते. त्याचवेळी त्यांचा मोटारीला स्पर्श होताच त्यांना जबर शॉक लागला. यावेळी माने यांनी केलेला आरडाओरडा ऐकून शेजारील लोकांनी धावत येऊन लाईट बंद केली.
त्यानंतर जखमी अवस्थेत माने यांना उपचारासाठी रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, तोपर्यंत फार वेळ झाला होता.अमोल माने हे पदवीधर असून ते दहा वर्षांपासून सैन्य दलात 13 रेजीमेंट राष्ट्रीय रायफलमध्ये कार्यरत होते. अमोल यांची लहान बहीण पदवीधर असून तिच्या लग्नाची जबाबदारी अमोल यांच्यावर होती. वडील शेतकरी असून त्यांनाही अमोल यांचा मोठा आधार होता. शेतीची आवड असल्याने अमोल सुट्टीवर आल्यानंतर शेती कामात वडिलांना हातभार लावत असत.
त्यांच्या आकस्मिक निधनाने चरेगांवसह परिसराला धक्का बसला असून घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. सायंकाळी शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |