RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

धोम व कण्हेर धरणग्रस्तांचा आता थेट जलाशयात साखळी आंदोलनाचा इशारा

20 June 2019 at 00:19

सातारा : सातारा जिल्ह्यातील धोम व कण्हेर धरणासाठी शेकडो शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या पण, पुनर्वसनासाठी त्यांना आजही संघर्ष करावा लागत आहे. त्याचाच भाग म्हणून थेट धोम जलाशयात उतरून आंदोलन करण्याचा इशारा जनजागर प्रतिष्ठानचे जिल्हा समन्यवक देवराज देशमुख व श्रीहरी गोळे यांच्यासह धरणग्रस्तांनी दिला आहे.

धोम व कण्हेर धरणग्रस्तांची कब्जे रक्कम जमा करून जमीन वाटप करणे व इतर महत्वाच्या मागणीसाठी आता धोम व कण्हेर धरण परिसरातील मालादपूर, बोरीव, आसरे, रणावळे, रामनगर, तांबी, पाटेश्वर नगर, वेळे-कामथी, चोरगेवाडी, साय गाव, वाघेश्वर, भणंग, देशमुख नगर, पिंपरी, रिटकवली, मोरावळे येथील धरणग्रस्तांनी मंगळवारी दि २जुलै रोजी सकाळी दहा वाजल्यापासून धोम जलाशयात उतरून साखळी आंदोलन करण्याचा इशारा सातारचे अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. आज निवेदन देण्यासाठी धरणग्रस्तांनी गर्दी केली होती.हे धरणग्रस्त गेली पंचेचाळीस वर्ष संघर्ष करीत आहेत. पूर्वी नुकसानभरपाई रक्कमेतून ६५टक्के रक्कम वसूल केली जात नव्हती. तसा पुनर्वसनाचा कायदा ही नव्हता. तरीही आता रक्कम भरून सुद्धा धरणग्रस्तांना जमीन वाटप करण्याची प्रक्रिया बंद करण्यात आली आहे. दि १मे १९७३ साली महाराष्ट्र दिनी शासन निर्णय क्र. एच पी ए-१०७१/४१५८/र-नुसार जमिनीची उपलब्धता व वाटपाचे प्रमाणे रक्कम भरून पुनर्वसित जमिनीचा ताबा धरणग्रस्तांना देण्यात आला होता. आता या प्रक्रियेला खीळ बसली आहे. त्यामुळे धरणग्रतांना स्वमालकीची जमीन नाही, पुनर्वसनाचा पत्ता नाही अशी अवघड परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यांना त्यांच्या हक्काची जमीन न देता त्यांच्या दुसऱ्या पिढीवर सुद्धा अन्याय होत आहे. पुनर्वसन खात्यात अनेकदा हेलपाटे मारावे लागत आहेत. आता सहनशीलता संपली असून सर्व धरणग्रस्त पावसातच धोम जलाशयात उतरून साखळी आंदोलन करणार आहेत. या आंदोलनासाठी देवराज देशमुख, श्रीहरी गोळे, काशिनाथ बैलकर, रामचंद्र वीरकर, सुभाष सुळके, अमित पोळ, जितेंद्र गोगावले, नामदेव सणस, दत्तात्रय गोगावले यांच्यासह कुटूंब सहभागी होणार असून कायदा व सुव्यवस्था निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तरी जिल्हा प्रशासनाने त्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष केंद्रित केले पाहिजे, अशी अपेक्षा सातारकर जनता करीत आहे. ठोस उपाययोजना करणे आवश्यक असून आणखी किती परवड धरणग्रस्तांची करणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

जावली तालुक्यातील अवैद्य दारू विक्रेत्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी

गेली ११ वर्ष जावली तालुक्यात सुरु असलेली १३ दारू दुकाने महिलांनी व व्यसनमुक्ती संघटनांनी ऐतिहासिक पाऊल उचलून बंद केली होती.

3 hours before

एकावर पोस्को अंतर्गत गुन्हा

कराड जवळील एका गावात नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

4 hours before

तलावात बुडून युवकाचा मृत्यू

बामणवाडी (ता.कराड) येथे जांभळा नावच्या शिवारात असलेल्या कृषि विभागाच्या पाजर तलावात युवकाचा बुडून मृत्यू झाला.

4 hours before

सातार्‍यातून ट्रॅक्टर, दोन दुचाकी चोरी

सातारा शहर परिसरातून अज्ञात चोरट्यांनी तीन ठिकठिकाणाहून ट्रॅक्टर व दोन दुचाकी चोरुन नेला असून याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल झाले आहेत.

4 hours before