08:28pm | Feb 18, 2019 |
फलटण : सातारा जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष, युवा नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस उद्या मंगळवार दि. 19 रोजी विविध सामाजिक कार्यक्रम व उपक्रमाद्वारे साध्या पध्दतीने साजरा होत असून यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी हार, गुच्छ, फुले, भेटवस्तू न आणता जिल्ह्यातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी वह्या व अन्य शालेय साहित्य यानिमित्ताने भेट म्हणून द्यावे ते या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय काँग्रेस प्रदेश समिती सदस्य जयकुमार शिंदे यांनी सांगितले.
वाढदिवसानिमित्त मंगळवार दि. 19 रोजी सकाळी 9 वाजता उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील रुग्णांना फळेवाटप, त्यानंतर शहरातील विविध विकास कामांची भूमिपूजने करण्यात येणार आहेत. त्यामध्ये प्रभाग क्रमांक 3 मधील रस्ता खडीकरण, डांबरीकरण, समाजमंदिर नूतनीकरण कामाचा शुभारंभ, स्मशानभूमि सुशोभिकरण शुभारंभ करण्यात येणार आहे. प्रभाग क्रमांक 11 मधील रस्ता काँक्रीटीकरण शुभारंभ, स्वामी विवेकानंदनगर येथील पिण्याच्या पाणी पुरवठा पाईप लाईन कामाचा शुभारंभ, कॉलेज रोड येथे पेव्हींग ब्लॉक बसविणे शुभारंभ करण्यात येणार आहे.
संत रोहिदास जयंती उत्सव समिती आयोजित साई प्रसिध्दी हॉल येथील कार्यक्रमास उपस्थिती, त्यानंतर स्वराज दुध प्रकल्पातील कर्मचार्यांच्यावतीने निंभोरे येथील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य व खाउ वाटप. सकाळी 10.30 वाजता श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल, मलठण येथे रक्तदान शिबीर उदघाटन, रामभाउ शेंडे मित्रमंडळाच्यावतीने मोफत रिक्षा योजना लोकार्पण आणि शहर व तालुक्यातील लोकांच्या शुभेच्छा स्विकारणे. त्यानंतर 11.30 वाजता माण तालुक्यातील नियोजित कार्यक्रमासाठी रवाना.
दुपारी 3.30 वाजता वाठार निंबाळकर व वाखरी येथे जिल्हा परिषद सदस्या अॅड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांच्या फंडातील विकासकामांची भूमिपूजने तसेच वाखरी येथिल 10 लाख रु निधीचे सभा मंडप भुमीपुजन आणि सायंकाळी 5 वाजता शंकर मार्केट येथे आयोजित शहीद जवान सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेस उपस्थिती.
सायंकाळी 5.30 ते 7.30 लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर साखर कारखाना कार्यस्थळावर त्या परिसरातील ग्रामस्थांच्या शुभेच्छा स्विकारणे. रात्री 8 वाजता कोळकी येथे कुस्त्यांच्या भव्य आखाड्यास भेट व सत्कार. वाढदिवसानिमित्त आयोजित विविध लोकोपयोगी कार्यक्रम उपक्रमांचे नियोजन असून कोणीही यानिमित्ताने हार, फुले, गुच्छ, भेटवस्तू न आणता शालेय साहित्यच द्यावे अशी विनंती जयकुमार शिंदे यांनी केली आहे.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |