सातारा : सातार्यातील नामचीन गुंड दत्तात्रय रामचंद्र जाधव उर्फ दत्ता जाधव हा गेली दीड दशके सातारा पोलिसांसाठी डोकेदुखी ठरला होता. दत्ता जाधववर जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांनी मोक्का कायद्यान्वये कारवाई केल्यानंतर दत्ता जाधव हा फरारी झाला होता. गेल्या आठवड्यात सातारा व सांगली पोलिसांनी संयुक्तपणे धाडसी कारवाई करीत जत तालुक्यातील प्रतापपूर गावात धाड टाकून दत्ता जाधवला पकडण्याचा प्रयत्न केला होता. परंतू सहकार्यांच्या मदतीने दत्ता जाधवने पोलिसांवरच दगडफेक करुन तेथून पलायन केले होते. सरतेशेवटी दत्ता जाधव यास अटक करण्यात आज पोलिसांना यश आले आहे. दत्ता जाधवच्या अटकेपर्यंत सातारा टुडे ने आपला निर्भिड बाणा शेवटपर्यंत जोपासला आहे.
सातारा येथील कुख्यात गुंड दत्तात्रय जाधव याने आपल्या अवैध साम्राज्याचा विस्तार करीत असताना सातारा जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था धाब्यावर बसवून आपले अवैध साम्राज्य वाढवलेले होते. प्रतापसिंह नगरातील आपल्या अभेद्य किल्ल्यात राहून दत्ता गेली दीड दशके पोलिसांसाठी डोकेदुखी ठरला होता. पोलिसांनाच प्रतिआव्हान देवून गेली अनेक वर्षे बॅकफुटवर ठेवले होते. परंतू तत्कालीन जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांनी दत्तावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करुन त्याला दोन वर्षे तुरुंगात बसविले होते. परंतू जेलमधून बाहेर येताच, दत्ता जाधवने पुन्हा आपले उद्योग सुरु केले होते. त्यामुळे दत्ता जाधव हा पुन्हा एकदा पोलिसांसाठी डोकेदुखी ठरतोय की काय, अशी शक्यता असतानाच गडचिरोलीमध्ये नक्षल्यांचा कर्दनकाळ ठरलेल्या संदीप पाटील यांनी सातारा पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतरच दत्ता जाधवचे काऊंटडाऊन सुरु झाले होते. अवैध सावकारी प्रकरणात सातारा टुडे ने निर्भिड वार्तांकन करुन अनेक अवैध सावकारी करणार्यांवर पोलिसांना कारवाई करण्यास भाग पाडले होते. याही प्रकरणात दत्ता जाधवचा हात असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर इतर सावकारांप्रमाणेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा (मोक्का) अन्वये गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर दत्ता जाधव पृष्ठभागाला पाय लावून सातार्यातून पळाला होता. यानंतर सातारा पोलीस दत्ताचा शोध घेत होते.
नुकतेच जिल्ह्यात दाखल झालेले परिवेक्षाधिन पोलीस अधीक्षक पवन बनसोड यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दत्ताला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक तयार केले होते. गेल्या आठवड्यात सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात असणार्या प्रतापपूर गावात दत्ता जाधव असल्याची पक्की खबर परिवेक्षाधीन पोलीस अधीक्षक पवन बनसोड यांना मिळाली होती. त्या आधारे सातारा पोलिसांचे एक पथक सांगली पोलिसांच्या मदतीने प्रतापपूर येथे पोहोचले. परंतू कारवाईच्या अगोदरच दत्ता जाधवला याची कुणकूण लागल्यानंतर त्याने मानवी ढाल समोर करुन तेथून अंधाराचा फायदा घेवून पळ काढलेला होता. त्यावेळी पोलिसांना दत्ता जाधव सापडला नाही, परंतू दत्ताचा ब्रेन समजला जाणारा त्याचा भाऊ युवराज जाधव मात्र पोलिसांच्या हातात सापडला होता. भावाला अटक झाल्यानंतर दत्ता जाधव हा सैरभैर झाला होता. त्यामुळे त्याने थेट प्रतापपूर येथून सातारा येथील प्रतापसिंह नगरात आसरा घेतला होता. 26 मार्च पासूनच सातारा पोलिसांनी प्रतापसिंह नगरामध्ये फिल्डिंग लावलेली होती. दरम्यान, आज दि. 4 मे रोजी दुपारी पोलिसांनी प्रतापसिंह नगरात कॉम्बिंग ऑपरेशन करीत संध्याकाळी त्याला एका घरामध्ये लपून बसलेला असताना ताब्यात घेतले व त्याची प्रतापसिंह नगर ते बॉम्बे रेस्टॉरंट चौकापर्यंत धिंड काढून त्याची या भागातील दहशत मोडून काढण्याचा पोलिसांनी आज प्रयत्न केला.
‘सातारा टुडे’ने दत्ता जाधव फरार असल्यापासून निर्भिडपणे वस्तुनिष्ठ वार्तांकन करुन पोलिसांना त्यांच्या कमरेला असणारे शस्त्र परजण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला साद देवून सातारा पोलिसांनीही दत्ता जाधवच्या मुसक्या आवळण्याबाबत दिवसरात्र परिश्रम घेतले होते. आज सातारा पोलिसांनी दत्ता जाधवच्या मुसक्या आवळून व त्याची धिंड काढून सातारा पोलीस काय चीज आहे, ते दाखवून दिले आहे. कायद्यासमोर सर्वसमान आहेत. कितीही मोठा गुंड, गुन्हेगार असला तरी पोलीस त्याला शेवटी त्याची जागा दाखवतातच, हे जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील आणि परिवेक्षाधीन पोलिस अधीक्षक पवन बनसोड तसेच सातारा पोलिसांनी आज दाखवून दिलेले आहे.
‘सातारा टुडे’चा निर्भिड बाणा
‘सातारा टुडे’ने दत्ता जाधवच्या अटकेबाबत प्रथमपासूनच निर्भिडपणे वार्तांकन केले होते. त्यामुळे सातारा पोलिसांचाही दत्ताच्या अटकेबाबत आत्मविश्वास वाढलेला होता. सातारा टुडे ने निर्भिडपणे केलेल्या वृत्तांकनाची दखल घेवून सातारा टुडे च्या वाचकांनी सातारा टुडे च्या कार्यालयात फोन करुन सातारा टुडे चे अभिनंदन केले. जिल्ह्यातील अनेक पोलीस अधिकार्यांनीदेखील सातारा टुडे'च्या वस्तुनिष्ठ व निर्भिड वार्तांकनाचे कौतुक करुन पोलिसांच्या पाठिशी फक्त सातारा टुडे अशी पोचपावती दिली.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |