02:42am | Feb 09, 2020 |
सातारा : कोडोली (ता. सातारा) येथील दत्तनगर येथे कृष्णा नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेले परराज्यातील दोन युवक पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले. मात्र, त्यातील एकाचा मृतदेह शोधपथकाच्या हाती लागला असून, दुसऱ्या युवकाचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता. ही दुर्देवी घटना शनिवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली.
गंगाप्पा गारी आदर्श (वय २०, रा. कोनापुरम, अनंतपूर आंध्रप्रदेश) असे बुडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव असून, सागर एस सिद्धाप्पा (वय १९, रा. नेहरु कॉलनी, गौरीबिदनूर कर्नाटक) या युवकाचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता.
याबाबत अधिक माहिती अशी, सातारा शहरापासून चार किलो मीटर अंतरावर कोडोली हे गाव आहे. या गावातील दत्तनगर येथे कर्नाटक, मध्यप्रदेश आंध्रप्रदेश येथील सुमारे १२ ते १५ जण एकत्र राहत आहेत. हे सर्व युवक सेल्समन म्हणून काम करत आहेत. शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास कृष्णा नदीपत्रात कपडे धुण्यासाठी गेले होते. त्यावेळी कपडे धुवून झाल्यानंतर ते पाण्यात आंघोळीसाठी उतरले. त्यातील सागर सिद्धाप्पा व गंगापप्पा आदर्श यांना पाण्याचा अंदाज न आल्याने अचानक दोघेही बुडाले. हा प्रकार लक्षात येताच त्यांच्या मित्रांनी गावातील पोलीस पाटील व पोलिसांना माहिती दिली. सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे व त्यांची टीम तसेच शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमचे अध्यक्ष चंद्रसेन पवार,अब्दुल सतार, देवा गुरव, गणेश निपाने, आदित्य पवार यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. या जवानांनी नदीपात्रातून उतरून बुडालेल्या युवकांचा शोध घेण्यास सुरूवात केली. त्यावेळी गंगाप्पा आदर्श याचा मृतदेह सापडला. मात्र, सागर सिद्धाप्पा याचा रात्री उशिरापर्यंत शोध लागला नाही. सातारा शहर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.
मित्रांचा नदीपात्राजवळ आक्रोश..
एकमेकांसोबत रोज सकाळी घराबाहेर पडणारे मित्र डोळ्यादेखत बुडाल्याने त्यांच्या मित्रांनी प्रचंड आक्रोश केला. आपापल्या गावी फोनवर या दुर्देवी घटनेची माहिती सांगत मित्र रडत होते. हे पाहून उपस्थितांनाही आपले अश्रू आवरता आले नाहीत.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |