कराड : विटा रस्त्यावर कराड तालुक्यातील हजारमाची गावच्या हद्दीत एसटी व कार यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातात कारमधील एक जण ठार झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. गुरुवार रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
कराड-विटा मार्गावर विट्याकडून कराडकडे येणारी एसटी व कराडहून विट्याकडे निघालेल्या कारची हजारमाची गावच्या हद्दीत समोरासमोर धडक होवून अपघात झाला. या अपघातात गौरव सुभाष गाडेकर (वय २७, रा. यदोगोपाळ पेठ, सातारा) हा युवक जागीच ठार झाला. तर अक्षय राजाराम साळगावकर (वय २२, रा. सैदापूर, कराड) हा गंभीर जखमी झाला. जखमीला उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात दाखल केले आहे.
दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्यासह अपघात विभागाचे खलील इनामदार, प्रशांत जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन अपघाताचा पंचनामा केला.
या दरम्यान, एसटी व कारमध्ये झालेल्या या अपघाताची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत असतानाच पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर रात्री दीड वाजण्याच्या सुमारास एसटी व एस. आर. एस. ट्रॅव्हल्स यांच्यामध्ये दुसरा अपघात झाला. पोलिसांनी त्वरित अपघात स्थळी धाव घेतली. परंतू महामार्गावर झालेल्या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नव्हते. पोलिसांनी अपघाताचा पंचनामा करून ट्रॅव्हल्स पोलिस ठाण्यात आणली आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |