महाबळेश्वर : कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जग हादरून गेले आहे सरकारने जनतेला घरातच बंदीस्त राहण्याचे आदेश दिले. लॉकडाऊनमुळे सर्व व्यवसाय बंद झाले असून देशाच्या आर्थिक घडी विस्कटलेली आहे. लोकांना उदरनिर्वाहाचा प्रश्न भेडसावत आहे. रोज कमावून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणार्या कामगारांवर लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना व्हायरसचे संकट समोर असताना लॉकडाऊनमुळे रोजगार उपलब्ध होत नसल्याने कामगार वर्गामध्ये चिंतेचे वातावरण असून कामगार आपल्या मूळ गावी परतण्याचे मार्ग शोधत आहेत.
महाबळेश्वर प्रसिद्ध थंड हवेचे पर्यटनस्थळ. लॉकडाऊनमुळे संपूर्ण महाबळेश्वरचे जनजीवन ठप्प झाले आहे. कामानिमित्ताने आलेला परप्रांतीय कामगार वर्ग तालुक्यात मोठया प्रमाणात अडकून पडला आहे. महाबळेश्वर येथील वेण्णालेक परिसरात कर्नाटक येथून आलेले सुमारे 50 ते 60 बांधकाम कामगार लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडले आहेत. लॉकडाऊनमुळे रोजगार उपलब्ध होत नसल्याने व जवळील सर्व अन्नधान्य साठा व पैसे संपल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाकडून मदत मिळण्यास विलंब होत असल्याने हे परप्रांतीय कामगार आपल्या मूळगावाकडे परतण्याचा मार्ग शोधत आहेत. दळणवळण व वाहतूक व्यवस्था ठप्प असल्याकारणाने हा परप्रांतीय कामगारवर्ग महाबळेश्वरात अडकून पडला आहे.
जिल्हा प्रशासनाने आम्हाला आमच्या मूळगावी परतण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती कामगार वर्ग करत आहे. आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाने परप्रांतीय कामगार वर्गाचे प्रश्न लवकरात लवकर अधिक कार्यक्षमतेने सोडवावेत. तालुक्यातील सामाजिक व सेवाभावी संस्थांनी अशा परप्रांतीय कामगार वर्गांना मदतीचा हात पुढे करण्याची गरज आहे.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |