01:01am | Aug 14, 2018 |
कराड : बेरड, नायका आणि रामोशी या सर्व जमाती एकच आहेत. देशातील अन्य सर्व राज्यामध्ये या जमातींचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जाती/जमाती सुधारित कायदा 1976 ची तात्काळ अंमलबजावणी करून रामोशी जमातीचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करून घटनात्मक संरक्षण द्यावे, अशी मागणी कराड तालुक्यातील रामोशी-बेरड समाजाच्यावतीने सोमवारी मोार्चाव्दारे करण्यात आली. तसेच 15 ऑगस्टपर्यंत शासनाने मागणी मान्य करावी, अन्यथा 16 ऑगस्टपासून राज्यभर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. जय मल्हार क्रांती संघटनेच्यावतीने कराड तहसील कार्यालयावर या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
शहरातील राजर्षि शाहू महाराज पुतळा चौकातून राजर्षि शाहू यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून मोर्चाला सुरूवात झाली. त्यानंतर मोर्चा दत्त चौकात आला. तेथे जय मल्हार क्रांती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष मोहनराव मदने यांच्या हस्ते छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालण्यात आला. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलत शिताळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उपाध्यक्ष मोहनराव मदने यांनी मोर्चाचे नेतृत्त्व केले. ‘रामोशी समाजाला एसटीचे आरक्षण मिळालेच पाहिजे, आरक्षण आमच्या हक्काचं नाय कुणाच्या बापाचं, आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचा विजय असो, यळकोट येळकोट जय मल्हार’ अशा घोषणा देत मोर्चा तहसीलदार कार्यालयासमोर पोहचला. तेथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.
राज्य उपाध्यक्ष मोहनराव मदने यांच्यासह आनंदराव जाधव, लक्ष्मण मदने, पंचायत समिती सदस्य चंद्रकांत मदने, उदय मंडले, दादासाो मंडले, प्रशांत चव्हाण, अमोल चव्हाण, अशोक मदने, दादाराम जाधव, रंगराव मदने, आबासाो जाधव आदी पदाधिकार्यांनी मनोगत व्यक्त केले. रामोशी बेरड समाजाकडून राज्यात सर्वत्र तहसीलदार कार्यालयावर मोर्चे काढण्यात येत आहेत. त्याची दखल घेवून शासनाने तातडीने संघटनेच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा 16 ऑगस्टपासून कोल्हापूूर जिल्ह्यातून रास्ता रोको आंदोलन सुरू होईल. संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन केले जाईल, असा इशारा आनंदराव जाधव यांनी दिला. यावेळी मागण्यांचे निवेदन रामोशी समाजातील महिलांनी तहसीलदार राजेंद्र शेळके यांना दिले. मोर्चात रामोशी बेरड समाजातील महिला, पुरूष व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |