05:47pm | Apr 07, 2020 |
सातारा : खोटे बोलून रस्त्यावर दुचाकीवरून फिरणाऱ्या युवकांना शाहूपुरी पोलिसांनी आत चांगलाच प्रसाद दिला. आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास राधिका रस्त्यावर हॉटेल सेनोर चौकात शाहुपुरी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. अनेक युवकांना पोलिसांनी सोप दिल्याचे चित्र पाहताच दुचाकी घेऊन येणाऱ्या युवकांनी रस्त्यातच धूम ठोकली.
आज दुपारी शाहूपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विशाल वायकर हे राधिका रस्त्यावर आपल्या पथकासह पेट्रोलिंग करीत असताना रस्त्यावरून विनाकारण अनेक युवक दुचाकीवरुन येजा करीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हॉटेल सेनार चौकात त्यांनी अचानक वाहन तपासणी मोहीम हाती घेतली. शाहूपुरी पोलिसांनी अचानक घेतलेल्या या आक्रमक पवित्र्यामुळे दुचाकीवरून विनाकारण फिरणाऱ्या युवकांची चांगलीच तंतरली. दुचाकी थांबवून युवकांकडे विचारणा केली असतात त्यातील अनेक जणांनी पोलिसांना खोटे सांगण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचे पितळ उघडे पडल्याचे लक्षात येताच पोलिसांनी त्यांना चांगलाच काठीचा प्रसाद दिला. अनेक युवकांनी तर २०१५-१६ सालचे ओळखपत्र दाखवण्याचा प्रयत्न केला. यावरील तपासणी दरम्यान दुचाकी एकाची, परवाना दुसऱ्याचा तर ओळखपत्र तिसऱ्याचे असल्याचे लक्षात आल्यानंतर अशा युवकांवर पोलिसांनी धडक कारवाई करत त्यांची रवानगी पोलीस ठाण्यात केली. यावेळी एका तासात सुमारे ५० पेक्षा अधिक दुचाकी चालकांवर कारवाई करण्यात आली.
युवकाने घातले लोटांगण
कारवाईदरम्यान एका युवकाने खोटे ओळखपत्र दाखवण्याचा प्रयत्न केला. ओळखपत्राची खातरजमा केली असता ते तीन वर्षापूर्वीचे असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी रस्त्यावरच त्याची चांगलीच धुलाई केली. आपण खोटे पडल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित युवकाने रस्त्यावरच पोलिसांसमोर लोटांगण घालून माफी मागण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्याला व त्याच्यात दुचाकीला शाहुपुरी पोलीस ठाण्यात नेऊन त्याच्यावर कारवाई केली.
चार चाकी वाहन चालकांवरही कारवाईचा बडगा
या तपासणी अनेक जण याच मार्गावरून चारचाकी वाहनातून प्रवेश करत असल्याचे निदर्शनास आले. अशा सर्व वाहने थांबवून वाहनांची कागदपत्रे, वाहनांमधील बसलेली लोक कुठे निघाले आहेत? याबाबतची सविस्तर माहिती घेतल्यानंतरच ते वाहन सोडण्यात येत होते.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |