04:29pm | Apr 07, 2020 |
सातारा : कॅलिफोर्निया (अमेरिका) येथून आलेल्या 63 वर्षीय व्यक्तीला सुमारे 16 दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयात कोरोना अनुमानित म्हणून दाखल केले होते. यानंतर कोरोना चाचणीमध्ये त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यानंतर त्या व्यक्तीवर जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचार सुरु होते. दरम्यान, त्याचा 14 व्या दिवसाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे जिल्हा प्रशासनाने समाधान व्यक्त केले होते. मात्र असे असताना दुसर्याच दिवशी पहाटे त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचा कालपर्यंत सस्पेन्स होता. मात्र आज सकाळी त्या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्या व्यक्तीचा मृत्यू कोरोनासह हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
याबाबत माहिती अशी की, सुमारे 16 दिवसांपूर्वी कॅलिफोर्निया (अमेरिका) येथून आलेल्या वृद्ध दांम्पत्याला कोरोना अनुमानित म्हणून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, पुणे येथील या दाम्पत्याच्या घशाच्या स्त्रावाच्या नमुन्याची तपासणी केल्यानंतर त्या वृद्ध दाम्पत्यापैकी 63 वर्षीय पुरुषाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. जिल्ह्यातील पहिलाच कोरोना बाधित रुग्ण सापडल्यामुळे खळबळ उडाली होती. 14 व्या दिवशी या रुग्णाची चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यामुळे प्रशासनासह आरोग्य कर्मचारी व जिल्ह्यातील नागरिकांमधूनही समाधान व्यक्त केले जात होते. मात्र हा आनंद फार काळ टिकला नाही. काल पहाटे हा रुग्ण आयसोलेशन वॉर्डातच असणार्या स्वच्छतागृहाकडे निघाला असतानाच अचानक खाली पडला. वैद्यकीय सूत्रांनी त्याची तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आले. काल सकाळीच जिल्हाधिकार्यांनी या रुग्णाच्या बाबतीत माहिती देण्याअगोदरच ही बातमी प्रसारमाध्यमांमध्ये लीक झाली. त्यानंतर कोरोना बाधिताच्या मृत्यूमुळे जिल्हाभरात खळबळ उडाली. त्यानंतर अनेकांनी याबाबत जिल्हाधिकार्यांना खुलासा करण्याची मागणी केली. काल दुपारी साडेबाराच्या दरम्यान, सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी मृत्यूचे कारण प्राथमिक अंदाजानुसार या रुग्णाचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाला असल्याचे जाहीर केले होते. मात्र, काल रात्री उशिरापर्यंत पंधराव्या दिवसाचा चाचणी रिपोर्ट आलेला नव्हता. त्यामुळे मृत्यूचे खरे कारण समजू शकले नाही. काल दुपारी मृत्यू झालेल्या कोरोना बाधित रुग्णावर सातारा जवळच्या संगम माहुली येथील स्मशानभूमीमध्ये शासनाने निर्धारित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार मोठी खबरदारी घेवून अंत्यसंस्कार करण्यात आले. आज सकाळी त्या 63 वर्षीय कोरोना बाधित व्यक्तीचा पंधराव्या दिवसाचा चाचणी रिपोर्ट आला असून ती व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली असून त्या व्यक्तीचा मृत्यू कोरोना तसेच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |