RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

अंध सागर बोडकेकडून १२५ दिवसात २१ वेळा ‘कळसुबाई’ सर

04 June 2019 at 16:52

नाशिक : शहरातील गरुडझेप प्रतिष्ठानचा अंध दुर्गसंवर्धक सागर बोडकेने १२५ दिवसात २१ वेळा कळसुबाई शिखर सर करून नवीन विक्रम केला. रविवारी त्याने २१ व्यांदा शिखरावर चढाई केली. त्यावेळी त्याच्या पालकांसह प्रतिष्टानचे पदाधिकारी उपस्थित होते.

सागरने २६ जानेवारी रोजी विक्रमाचा निश्चय करून कळसुबाई शिखरावर चढण्यास सुरुवात केली. केवळ १२५ दिवसात त्याने विक्रमाला गवसणी घातली. त्याच्या या विक्रमाने युवावर्गास प्रेरणा मिळेल. प्रत्येक मोहिमेत सागरने सामाजिक संदेश देत सामाजिक भानही जपले. अनेक संस्थांची सागरला या उपक्रमासाठी मदत झाली. रविवारी २१ व्या मोहिमेप्रसंगी गरुडझेप प्रतिष्ठानचे कार्यकर्ते डॉ. संदीप भानोसे, रेणू, संकेत भानोसे, योगेश अहिरे, चंद्रकांत नाईक, यश साबळे, मनोज आणि स्वाती आहिरे सागरला प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित होते.

कार्यक्रमास जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, वंडर बुक ऑफ रेकॉर्डस्च्या प्रतिनिधी अमी छेढा उपस्थित राहणार आहेत. दुर्गप्रेमींनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. संदीप भानोसे यांनी केले आहे.

अकरा ऑगस्ट रोजी प्रमाणपत्राचे वितरण

सागरचे आई-वडील, इतर नातेवाईक आणि अनेक मित्रांनीही या मोहिमेत सहभाग घेतला. मुंबई, सातारा, नाशिक, पुणे या ठिकाणाहूनही काही जण आले होते. अकरा ऑगस्ट रोजी  दुपारी ३.३० वाजता भाभानगर येथील सावरकर सभागृहात सागरला विक्रम केल्याबद्दल प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

विधानपरिषदेचे सभापती नेमके कोणाचे ?

राज्याच्या सर्वोच्च सभागृहाचे सभापती खरे तर सर्व पक्षांचे हवे पण ते एका पक्षाचे असल्यासारखे वागत आहेत,'' त्यामुळे विधानपरिषदेचेसभापती नेमके कोणाचे? हा प्रश्‍न आता उपस्थित झाला आहे.

yesterday

मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर खातेवाटप जाहीर; पाहा, कोणाला मिळालं कुठलं खातं?

राज्य मंत्रिमंडळाचा रविवारी सकाळी (दि.१६) विस्तार झाल्यानंतर नव्याने १३ मंत्र्यांना मंत्रिमंडळात समावून घेण्यात आले. तर विद्यमान ६ मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले.

17 June 2019 at 14:44