सातारा : येथील राधिका रोडवर प्रतापसिंह शेतीफार्म नजीक असलेल्या विहरीत प्रतीक गुलाब मतकर (वय 16, रा.बुधवार) या युवकाचा रविवारी दुपारी पाण्यात बुडून मृत्यू झाला. पतंग उडवत असताना ही दुर्घटना घडल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत प्राथमिक माहिती अशी, रविवारी सकाळी प्रतीक मतकर हा पतंग उडवत होता. यावेळ पतंग उडवत असताना तो पतंग प्रतापसिंह शेती फार्म परिसरात गेल्याने प्रतीक त्या पतंगापाठोपाठ गेला. या परिसरात खोल विहिर असून प्रतीकला त्याचा अंदाज आला नाही. दुर्देवाने तो या विहरीत पडला. प्रतीक बराच वेळ दिसत नसल्याने लक्षात आल्यानंतर परिसरात पाहणी केली असता विहरीमध्ये संशयास्पद हालचाली जाणवल्या.
तात्काळ या घटनेनंतर प्रतीक मतकरची शोध मोहिम राबवण्यात आली. मुलगा विहतीर पडल्याचे वृत्त परिसरात पसरल्यानंतर बघ्यांची गर्दी उसळली. शाहूपुरी पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रतीकच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. विहरीतील शोध मोहिम राबवल्यानंतर मृतदेह हाती लागला. तो मृतदेह प्रतीक याचा असल्याचे समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह जिल्हा शासकीर रुग्णालयात हलवला. दुपारी उशीरापर्यंत शवविच्छेदनाचे काम सुरु होते. या घटनेची माहिती समजल्यानंतर मतकर कुटुंबियांनी रुग्णालयात धाव घेतली. प्रतीकचा मृत्यू झाल्याचे समोर आल्यानंतर कुटुंयिबांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |