सातारा : कवडेवाडी, हिवरे ता.कोरेगाव येथे तब्बल १३ जिवंत गावठी बॉम्ब सापडले असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहेे. बॉम्ब शोधक व नाशक पथक, स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाने संयुक्तरीत्या कामगिरी केली. हे सर्व गावठी बॉम्ब शिकारीसाठी वापरले जाणार असल्याची कबुली मनिबबे सुपरचंद राजपूत (वय ४५, मूळ रा.उत्तरप्रदेश सध्या. रा.कवडेवाडी) याने पोलिसांनी दिली आहे.
याबाबत प्राथमिक माहिती अशी, रविवारी सकाळी कवडेवाडी, हिवरे येथे बॉम्ब असल्याची माहिती पोलिस हवालदार निलेश दयाळ या पोलिसांना मिळाली. या घटनेने सातारा पोलिस हडबडून गेले. तत्काळ बॉम्ब शोधक पथक डॉग स्कॉडसह एलसीबी सोबत घटनास्थळी दाखल झाले. वाठार पोलिस ठाण्याच्या हद्दीत डोंगरावर पोलिसांची शोध मोहिम सुरु झाली. सकाळी सुरु झालेले हे सर्च ऑपरेशन दुपारपर्यंत सुरु होते. कवडेवाडी गावच्या हद्दीत बॉम्ब असल्याची माहिती पसरल्यानंतर परिसरातील ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले व बघ्यांची गर्दीही उसळली होती. सुमारे 4 तासाहून अधिक काळ बॉम्ब शोधण्याची मोहिम राबवल्यानंतर १३ गावठी बॉम्ब पोलिसांना सापडले.
याप्रकरणी मनबिबे राजपूत याला ताब्यात घेतले असता त्याने रानडुकरे मारण्यासाठी गावठी बॉम्ब ठेवले असल्याची कबुली दिली. सातारा पोलिस दलाने सर्व गावठी बॉम्ब शोधून काढल्यानंतर त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. पोलिसांकडून दुपारपर्यंत घटनास्थळाचा पंचनामा सुरु होता. गुन्हा दाखल केल्यानंतर संशयिताला अटक केली. पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक धीरज पाटील, पोनि विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार विलास नागे, विनोद गायकवाड, मोहन नाचण, योगेश पोळ, संतोष जाधव, प्रवीण कडव, गणेश कापरे, केतन शिंदे, धिरज महाडीक, वैभव शिंदे, किरण मोरे, रुपेश साळुंखे, अमोल गवळी, निलेश दयाळ व श्वान सुर्या यांनी कारवाईत सहभाग घेतला.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |