06:21pm | Apr 04, 2018 |
सातारा : वीजबिल भरण्यासाठी महावितरणने ग्राहकांना ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यामुळे आर्थिक भुर्दंड व वीजपुरवठा खंडित होण्याची कारवाई व गैरसोय टाळण्यासाठी लघुदाब वीजग्राहकांनी धनादेशाऐवजी महावितरणच्या वेबसाईट किंवा मोबाईल अॅपद्वारे वीजबिलाचा ऑनलाईन भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
धनादेशाद्वारे वीजबिलाचा भरणा केल्यास कोणत्याही कारणामुळे धनादेश बाउन्स होण्याची शक्यता असते. सद्यस्थितीत महावितरणचे दरमहा सुमारे 7 लाख ग्राहक वीजबिलाचा भरणा धनादेशाद्वारे करीत आहेत. त्यापैकी साधारणत:10,000 धनादेश दरमहा बाउन्स होतात. त्यामुळे ग्राहकांना 350 रुपये दंड, धनादेश अंतिम मुदतीच्या तारखेनंतर वटल्यास पुढील बिलात लागून येणारी थकबाकी यासह सदर ग्राहकाची पुढील सहा महिने धनादेशाद्वारे वीजबिल भरण्याची सुविधा स्थगित केली जाते. तसेच धनादेश बाउन्स होणे हा पराक्राम्य संलेख अधिनियम 1881 च्या कलम 138 अन्वये दखलपात्र फौजदारी गुन्हा आहे.
रिझर्व्ह बँकेच्या नियमांप्रमाणे, धनादेश वटण्यास साधारणत: तीन ते चार दिवसांचा कालावधी लागतो. धनादेश वटल्यानंतरच बिलाची रक्कम प्राप्त झाल्याची नोंद ग्राहकांच्या खात्यावर होते. अनेक ग्राहक अंतिम मुदतीच्या एक-दोन दिवसाअगोदर धनादेशाद्वारे वीजबिलाची रक्कम भरतात. त्यामुळे मुदतीनंतर वीजबिलाचा भरणा झाल्यास संबंधित ग्राहकांना धनादेशाद्वारे भरलेली रक्कम थकबाकी म्हणून पुढील बिलात लागून येते किंवा कोणत्याही कारणाने धनादेश बाउन्स झाला तर आर्थिक दंडासह वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाते. काही ठिकाणी एखादी व्यक्ती 15 ते 20 वीजग्राहकांच्या वीजबिलांची रक्कम रोख स्वरूपात घेऊन ती धनादेशाद्वारे भरते. यात धनादेश बाउन्स झाल्यास त्याचा वीजग्राहकांना नाहक आर्थिक फटका बसू शकतो व त्यांचा वीजपुरवठाही खंडित होऊ शकतो.
या सर्व त्रासापासून वाचण्यासाठी व घरबसल्या वीजबिल भरण्यासाठी महावितरणची www.mahadiscom.in ही वेबसाईट व मोबाईल अॅपची सोय उपलब्ध आहे. इंटरनेट व मोबाईल अॅपच्या माध्यमातून सद्यस्थितीत सुमारे 35 लाख वीजग्राहक सुमारे 600 कोटी रुपयांचा दरमहा वीजबिल भरणा करीत आहेत. त्यामुळे धनादेशाऐवजी वीजग्राहकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |