फलटण : फलटण नगरपरिषदेने संकलित करात भरमसाठ वाढ केल्याच्या निषेधार्थ फलटण तालुक्यातील सर्व विरोधी पक्षांनी आज नगरपालिकेसमोर केलेले धरणे आंदोलन मुख्याधिकाऱ्यांनी नगरपालिकेने जुन्या पद्धतीने सध्या कर आकारनी करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आम्ही तात्पुरते आंदोलन मागे घेत असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले.
फलटण नगरपरिषदेने चतुर्थ वार्षिक मूल्यांकन (संकलीत कर )वाढवून त्याच्या नोटिसा नागरिकांना पाठवल्या होत्या या वाढीव रकमेच्या नोटिसा मुळे नागरिक हवालदिल आणि संतप्त झाले असताना फलटण तालुक्यातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत या वाढीव संकलित कराला तीव्र विरोध केला. या कर वाढीच्या निषेधार्थ आज नगरपालिकेसमोर सर्व विरोधी पक्षातर्फे धरणे आंदोलन धरण्यात आले. या आंदोलनात कृष्णा खोरे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष रणजीतसिंह नाईक निंबाळकर फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष नरसिंह निकम, फलटण नगर पालिकेतील विरोधी पक्षनेते समशेर सिंह नाईक निंबाळकर, काँग्रेसचे प्रांतिक सदस्य जयकुमार शिंदे, फलटण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष तुकाराम शिंदे, शहराध्यक्ष व नगरसेवक अशोकराव जाधव, शिवाजीराव फड़तरे, भाजपाचे सुशांत निंबाळकर भाजपचे शहराध्यक्ष उदय मांढरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, तालुकाध्यक्ष नितीन यादव, शहराध्यक्ष सचिन खानविलकर, शिवसेनेचे माजी उपतालुका प्रमुख प्रदीप झंणझणे, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज शिंदे, नगरसेवक सचिन बेडके, सचिन अहिवळे, ऋषिराज नाईक-निंबाळकर, काँग्रेसच्या सर्व नगरसेविका डॉ. सुभाष गुळवे, मितेश खराडे, मनोज कांबळे ,सचिन कांबळे, राजेश हेंद्रे, सुरेश देशपांडे, अभिजीत नाईक-निंबाळकर, आदि सहभागी झाले होते.
यावेळी आंदोलकांपुढे बोलताना नरसिंह निकम म्हणाले, की फलटण नगरपालिकेने मालमत्ता करांचा केलेला सर्वे व मूल्यांकन हे अमरावती येथील खाजगी कंपनीला ठेका देऊन केलेले आहे. हे सर्व मूल्यांकन चुकीच्या पद्धतीने झाल्याने त्याचा नाहक त्रास जनतेला होत आहे ज्या कंपनीने ठेका घेतला त्याला कोणताही अनुभव नसून चुकीची मोजणी केल्याने त्या कंपनीला काळ्या यादीत टाकावे. त्यांना नगरपालिकेने दिलेला मोबदला माघारी घ्यावा, त्याचप्रमाणे वाढिव संकलित कर नगरपालिकेने तातडीने मागे घ्यावा, जोपर्यंत संपूर्ण वाढिव करवाढ मागे घेतली जात नाही. आणि जुन्या पद्धतीने बिले दिली जात नाही, तोपर्यंत कोणीही कर भरणार नाही. असे निकम यांनी स्पष्ट केले. नगरपालिकेने नेमलेल्या खाजगी कंपनीने बेकायदेशीर मोजणी केली आहे. त्यामध्ये संडास बाथरूम जीना गॅलरी यांनाही कर लावण्यात आलेला आहे. चुकीच्या मोजणीमुळे आणि कर आकारणीमुळे जनतेमध्ये संतप्त वातावरण आहे. जनतेच्या बरोबर आम्ही कायम आहोत यापुढे कोनावरही अन्याय झाल्यास सहन करणार नाही. लोकभावनेचा नगरपालिका प्रशासनाने आदर करावा, आणि तातडीने संपूर्ण करवाढ मागे घ्यावी अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी दिला.
यावेळी आंदोलनस्थळी आलेले मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी आंदोलकांशी चर्चा करताना जनतेच्या भावनेचा आम्ही आदर करू चुकीच्या पद्धतीने कर आकारनी झाली असेल तर दुरुस्ती करण्यात येईल. नागरिकांनी हरकती नोंदवाव्यात त्याची सुनावणी घेण्यात येईल असे स्पष्ट केले. मात्र आंदोलकांनी आम्हाला लेखी स्वरुपात तुमचे म्हणणे पाहिजे असे स्पष्ट केल्यावर मुख्याधिकारी काटकर यांनी नगर पालिकेने कर आकारणीमध्ये बाथरूम संडास जिना गॅलरी पार्किंग क्षेत्राच्या भागावरती करण्यात आलेली कर आकारणी दुरुस्ती करून कमी करण्यात येईल. ज्या मिळकतीमध्ये भाडेकरू असतील त्यांचे मिळकतीच्या कराबाबत योग्य त्या भाडेवर कर आकारण्यात येईल सदर कामाकरिता अमरावती येथील नेमलेल्या कंपनीविरुद्ध न्यायालयीन कामकाजाबाबतचे म्हणणे नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून घेण्यात येईल. त्यानुसार न्यायालयाच्या निर्णयास अनुसरून सदर कंपनीला केलेल्या रकमेबाबत निर्णय घेण्यात येईल. नागरिकांना कर आकारण्याची प्रक्रिया प्रथमदर्शनी अयोग्य आहे ती पूर्ण होईपर्यंत सर्व मिळकतधारकांना सन 2017-18 साला प्रमाणे कराचा भरणा करण्याबाबत आम्ही लेखी प्रकटन देत आहे असे लेखी आश्वासन मुख्याधिकारी काटकर यांनी दिल्यावर आंदोलन तातपुरते मागे घेण्यात आले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |