04:54pm | Dec 18, 2018 |
मुंबई: 'प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांनी त्यांच्या व्यंगचित्रातून अनेक विषयांवर भाष्य केलं. पण त्यांनी त्यातून कधीच कुणाला दुखावलं नाही. उलट त्यांची व्यंगचित्रं विचार करण्यास प्रवृत्त करायची,' असं सांगतानाच 'लक्ष्मण यांच्यासाठी 'लेस टाइम' होता. पण ते आपल्यासाठी खऱ्या अर्थाने 'टाइमलेस' आहेत आणि 'टाइमलेस' राहतील,' असं गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. राजभवन येथे आर. के. लक्ष्मण यांच्या जीवनावर आधारित 'टाइमलेस लक्ष्मण' या पुस्तकाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज प्रकाशन करण्यात आलं. याप्रसंगी राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रांचा प्रचंड प्रभाव असल्याचंही सांगितलं. 'त्याकाळात वर्तमानपत्र वाचण्यापूर्वी प्रत्येक राजकारणी लक्ष्मण यांचं व्यंगचित्र पाहतंच असणार. कारण त्यातून नुसतंच परिस्थितीवर भाष्य केलं जायचं नसायचं तर त्यातून संदेशही दिला जायचा,' असं सांगतानाच 'लक्ष्मण यांनी त्यांच्या व्यंगचित्रातून कधीच कुणाला दुखावलं नाही. उलट त्यांनी व्यंगचित्रातून जखमा देण्यापेक्षा मलमपट्टी करण्याचं काम अधिक केलं. विचार करण्यास प्रवृत्त करणं ही त्यांच्या व्यंगचित्राची ताकद होती,' असं मोदी म्हणाले.
शब्दांमध्ये तीव्रतेने काहीतरी मांडण्याची जी ताकद आहे, तशीच हलक्याफुलक्या अंगाने सत्याला तीव्रपणे समोर आणण्याची ताकद व्यंगचित्रात आहे. लक्ष्मण यांनी साकारलेला एक कॉमन मॅन कार खरेदी करतो आणि म्हणतो की मी कार तर खरेदी केली पण आता रस्ता शोधतोय यावरुन ते तत्कालिन पायाभूत सुविधांवर भाष्य करतात, असा त्यांच्या कलाकृतीचा दाखला यावेळी मोदींनी दिला.
अटलजींच्या सरकारवेळी मी भाजपाचा सामान्य कार्यकर्ता म्हणून एकदा त्यांच्याकडे गेलो होतो. त्यावेळी त्यांच्याकडे मी आपल्या विमान कंपनीवर स्वागतासाठी महाराजाची प्रतिमा का लावतात. त्याऐवजी आपली कॉमन मॅनची प्रतिमा योग्य वाटते असे म्हटले होते. हे कुठूनतरी अटलजींच्या कानावर गेलं त्यानंतर काहीकाळ त्या विमान कंपनीतील तो महाराजा हटवून लक्ष्मण यांचा कॉमन मॅन लावण्यात आला होता, अशी माहितीही यावेळी मोदींनी दिली.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |

मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |