08:01pm | Jun 05, 2018 |
सातारा : गेली दोन दशके फलटण तालुका अवैध व्यवसाय व कारवायांमुळे धगधगत आहे. व्हाईट कॉलर राजकारणी व गुंडांमुळे फलटणचे वातावरण दूषित झालेले आहे. तत्कालीन पोलीस अधीक्षक के. एम. एम. प्रसन्ना, अभिनव देशमुख या डॅशिंग पोलीस अधीक्षकांनी आपापल्या परिने कायद्याचा आसुड ओढून फलटण तालुक्यातील गुन्हेगारी ठेचण्यात काही अंशी यश मिळवले होते. विद्यमान पोलीस अधीक्षक संदीप पाटीलही हाच कित्ता गिरवित आहेत. नुकतेच फलटण तालुक्यात दाखल झालेले आणि फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचा कार्यभार स्विकारलेले परिवेक्षाधीन पोलीस अधीक्षक पवन बनसोड यांनी फलटण तालुक्यातील अवैध व्यवसाय व गुंडापूंडांवर धडक कारवाया करुन त्यांच्या पुंग्या टाईट केल्यामुळे फलटण तालुक्यातील राजकीय पुढारी बिथरलेले आहेत.
साक्षात फलटण नरेशांच्या फोनलाही आयपीएस पवन बनसोड भीक घालत नसल्यामुळे फलटण तालुक्यामध्ये सध्या रामराज्य आल्याची फलटणवासियांची भावना निर्माण झाली आहे. 21 जानेवारी 2018 रोजी परिवेक्षाधीन पोलीस अधीक्षक पवन बनसोड जिल्हा अधीक्षक कार्यालयात रुजू झाले. त्यानंतर प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून 26 मार्च 2018 रोजी पवन बनसोड यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचा कार्यभार स्विकारला. कार्यभार स्विकारताच बनसोड यांनी आपल्या धडाकेबाज कारवायांमध्ये फलटणमधील अवैध व्यावसायिकांना जेरीस आणले. यामध्ये वाळू माफिया, मटका किंग, अवैध सावकारी, गुटखा, गांजा, अफू या अवैध व्यावसायिकांवर कारवाया करुन त्यांचे कंबरडे मोडल्यामुळे फलटणमध्ये काही दिवसांसाठी का होईना शांतता प्रस्थापित झाली आहे. तसेच फलटण तालुक्यातील राजकीय पुढारी व पदाधिकार्यांना ते भीक घालत नसल्यामुळे फलटण तालुक्यातील गुंडपूंड सैरभैर झालेले आहेत. त्यामुळे ‘चुकीला माफी नाही, पवन बनसोड बोले तो नो मर्सी’ असा मॅसेज फलटण तालुक्यामध्ये फिरत असल्यामुळे भलेभले गुंड फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याची पायरी चढण्यास कचरत आहेत.
सातारा येथील कुख्यात गुन्हेगार दत्ता जाधव याने गेल्यावर्षी जेलमधून सुटल्यानंतर आपल्या गुन्हेगारी कारवाया पुन्हा सुरु केल्या होत्या. त्यामुळे सातारा पोलीस दलाची डोकेदुखी वाढलेली होती. मोक्कान्वये कारवाई झाल्यानंतर दत्ता जाधवचा बंदोबस्त कसा करायचा, याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी फिल्डिंग लावलेली होती. अवैध सावकारी प्रकरणी व विविध गुन्ह्यांच्या अनुषंगाने दत्ता जाधव पोलिसांना हवा होता. सातारा टुडे ने दत्ता जाधवच्या अटकेबाबत प्रथमपासूनच निर्भिड वृत्तांकन केले होते. पवन बनसोड यांच्या अधिपत्याखाली पोलीस पार्टी दत्ता जाधवला जत तालुक्यातील एका गावामध्ये लपून बसलेल्या दत्ताला पकडण्यासाठी गेले असता दत्ताने मानवी ढाल पुढे करुन पोलीस पार्टीवरच तुफान दगडफेक केली होती. परिस्थिती चिघळू नये व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी पवन बनसोड यांनी पोलीस पार्टीला परत फिरण्याचे आदेश दिले. मात्र, दत्ता जाधवचा ब्रेन समजला जाणारा युवराज जाधवला पवन बनसोड यांच्या टीमने अटक केली होती.
त्यामुळे दत्ता सैरभैर झाला होता. त्यातच ‘सातारा टुडे’ने सातारा पोलिसांच्या खात्यात अजून एक एन्काऊंटर जमा होणार काय? असे वृत्तांकन करुन सातारा पोलिसांना सवाल केला होता. याची कुणकूण दत्तालाही लागली होती. त्यामुळे दत्ता जाधव एन्काऊंटरच्या भीतीने त्याचा 'सेफ किल्ला' समजल्या जाणार्या प्रतापसिंह नगरात लपून बसला होता. दत्ता प्रतापसिंह नगरात लपून असल्याची खबर पोलिसांना समजल्यानंतर पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी परिवेक्षाधीन पोलीस अधीक्षक पवन बनसोड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या अधिपत्त्याखाली पोलीस पार्टी तयार करुन प्रतापसिंह नगरावर छापा घालून दत्ताच्या मुसक्या आवळल्या होत्या. या कारवाईमध्ये पवन बनसोड यांनी पूर्ण कौशल्य पणाला लावले होते. कारण एकतर तो दत्ताचा इलाका होता. त्यातून काहीही होण्याची शक्यता नाकारता येवू शकत नव्हती. असे असताना पवन बनसोड यांनी अतिशय कौशल्याने परिस्थिती हाताळली होती. त्यामुळे कोणतीही अप्रिय घटना न घडू देता पवन बनसोड यांनी दत्ताच्या मुसक्या आवळल्या होत्या. याबाबत पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनीही पवन बनसोड यांची पाठ थोपटली होती.
सध्या फलटण तालुक्यात पवन बनसोडच ‘सिंघम’ आहेत. पवन बनसोड यांच्या 'सिंघम' कारवायांमुळे फलटणमधील राजकीय पुढारी व गुंडापूंडांचा 'चिंगम' झालेला आहे. पवन बनसोड यांनी कार्यभार स्विकारल्यानंतर फलटण तालुक्यात कोणतीही गंभीर अप्रिय घटना घडलेली नाही. त्यामुळे फलटणमध्ये सध्यातरी सर्वकाही सुरळीत आहे. पवन बनसोड यांचा फलटण तालुक्यातील कार्यकाळ थोड्याच दिवसांत संपणार असल्यामुळे पुन्हा गुन्हेगारी कारवाया डोके वर काढणार आहेत. त्यामुळे फलटणचे वातावरण पुन्हा जैसे थे होणार आहे. त्यामुळे पवन बनसोड यांना फलटण तालुक्यामध्ये कार्यकाल वाढवून देण्यात यावा, अशी मागणी सर्वसामान्य फलटणकर करीत आहेत.
उपविभागीय पोलीस अधिकार्याचा चार्ज देण्याची मागणी..
फलटण उपविभागाचे विभागीय पोलीस अधिकारी रमेश चोपडे यांची येत्या काही दिवसांमध्ये बदली होण्याची शक्यता आहे. चोपडे यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये वाखाणण्याजोगी कामगिरी केली आहे. मात्र, त्यांचा जिल्ह्यातील कार्यकाळ संपत आल्यामुळे त्यांची परजिल्ह्यात बदली होण्याची शक्यता आहे. त्यांच्या बदलीमुळे रिक्त होणार्या जागेवर परिवेक्षाधीन पोलीस अधीक्षक पवन बनसोड यांची वर्णी लावावी, अशीही मागणी फलटण तालुक्यामधून जोर धरु लागली आहे. त्यामुळे शासन याबाबत काय भूमिका घेणार, याकडे फलटण तालुक्याचे लक्ष लागलेले आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |