01:09am | Oct 22, 2018 |
सातारा : जावळी तालुक्याचे प्रवेशद्वार असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी गावात पाणी पुरवठा योजनेत घोळ करून ठेवणाऱ्या ठेकेदाराला एका तक्रारीने पुन्हा पाईपलाईन खोदकाम करावे लागले आहे. ठेकदाराचे पितळ उघडे पडले असून त्याला काळ्या यादीत समावेश करण्यात आला पाहिजे यासाठी आता दुसरी लढाई सुरू झाली आहे.
याबाबत माहिती अशी की, आनेवाडी ता. जावली येथे सण 2011 - 2012 अनेवाडी पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीच्या काम एका ठेकेदाराला देण्यात आले होते. या कामात ठरल्याप्रमाणे साहित्य वापरत नसल्याची तक्रार नोंदवली पण, ठेकेदारांनी दुर्लक्ष केले होते. अखेर या कामात झालेल्या भ्रष्टाचाराबाबत आनेवाडी ग्रामस्थांच्या वतीने विठ्ठल परबती फरांदे यांनी महाराष्ट्र राज्य लोक आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. तक्रारीची गंभीर दखल घेऊन दि 15 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता सातारा येथे शासकीय विश्रामगृहात समक्ष तक्रारदार व मा. उपआयुक्त महाराष्ट्र राज्य व सातारा जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पाणीपुरवठा अधिकारी यांच्या पुढे सुनावणी होऊन आनेवाडीत प्रत्यक्ष नळ पाणी पुरवठ्याच्या शासकीय मानकांनानुसार ठरलेल्या 'गलवानाइझ्ड' पाईप ऐवजी निकृष्ठ दर्जाची पी.व्ही.सी पाईप टाकल्याचे उघड झाले. या दुरुस्ती कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याने शासकीय सेवेत कुचराई करणाऱ्या संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यावर विभागीय चौकशीचे आदेश चालू झाले आहेत. त्यांना क्लीनचिट मिळू नये अन्यथा न्यायालयात याचिका दाखल करावी लागेल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. तक्रारी नुसार आनेवाडी नळ पाणीपुरवठा योजनेचे अंदाजपत्रक प्रमाणे पी.व्ही.सी पाईप काढून 'गलवानाइझ्ड' पाईप बसविण्याचे काम सुरू झाले आहे. या निर्णयाचे आनेवाडी ग्रामस्थांनी स्वागत केले आहे. तसेच निःपक्षपातीपणे या प्रकरणाची चौकशी करण्यात आली त्याबद्दल उपआयुक्त महाराष्ट्र राज्य व सातारा जिल्हा परिषदचे यांचे ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
या निर्णयाने जावली तालुक्यात ठेकेदारांना पोसणाऱ्या तथाकथित नेत्यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, प्रामाणिक अधिकारी व तक्रारदार यांनी गावच्या हिताचा प्राधान्याने विचार केला. त्यामुळे एक निकृष्ट दर्जाचे काम उघड झाले आहे. यातून भ्रष्ट अधिकारी कशी माया कमवितात? त्यांच्या संपत्तीची लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने तपासणी करावी अशी ही मागणी पुढे आली आहे.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |