02:02am | Apr 10, 2020 |
सातारा : गिरवी, ता. फलटण येथे एका नातेवाईकाचे निधन झाल्यानंतर त्याच्या अंत्यसंस्कारासाठी कोल्हापूरहून आलेली महिला कोरोना बाधित निघाल्यानंतर कोल्हापुरसह सातारा जिल्ह्यातही खळबळ उडाली होती. दरम्यान, जिल्ह्यातील गिरवी तसेच बनवडी येथे त्या महिलेचे वास्तव्य असल्यामुळे तिच्या संपर्कात आलेल्या 21 नातेवाईकांना जिल्हा प्रशासनाने क्वारंटाईन केले होते. काल गिरवी येथील 13 जणांना सातारा येथील जिल्हा रुग्णालयात, तर बनवडी येथील 8 नातेवाईकांना कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये अनुमानित म्हणून दाखल करण्यात आले होते. कालच त्यांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुणे येथील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाकडे तपासणीसाठी पाठविले होते. हे अहवाल आज पोहोचणे अपेक्षित होते. परंतू ते आज न मिळाल्यामुळे उद्या प्राप्त होतील, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.
गिरवी, ता. फलटण येथे एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे त्या व्यक्तीची जवळची नातेवाईक असणारी कोल्हापुरातील एक महिला गिरवी येथे आली होती. 20 ते 22 मार्च या दोन दिवसांच्या कालावधीमध्ये तिचे वास्तव्य गिरवी येथे होते. त्यानंतर ती महिला गिरवी येथून बनवडी, ता. कोरेगाव येथील नातेवाईकांकडे गेली होती. तिथे तिचे वास्तव्य 22 ते 28 मार्च दरम्यान होते. यानंतर ती 28 मार्च रोजी दुपारी कोल्हापूरला निघाली. यावेळी तिने सातारा येथील कणसे ढाबा ते कोल्हापूर असा ऍम्ब्युलन्सने प्रवास केला.
कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी कोल्हापुरात कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या एका महिलेचे सातारा जिल्ह्यात वास्तव्य असल्याचे कळविले होते. यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने तपासाची चक्रे फिरवत त्या महिलेच्या प्रवासाचा इतिहास तपासला. यात तिचे वास्तव्य फलटण येथील गिरवी व कोरेगाव तालुक्यातील बनवडी येथे झाले असल्याचे निष्पन्न झाले होते. दरम्यान, त्या महिलेचे गिरवी कनेक्शन समोर आल्यानंतर प्रशासनाने तत्काळ गिरवीत धाव घेत त्या महिलेच्या संपर्कात आलेल्या 13 नातेवाईकांना फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात तत्काळ क्वारंटाईन केले होते, तर बनवडी ता. कोरेगाव येथील तिच्या संपर्कात आलेल्या 8 नातेवाईकांनाही कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, काल गिरवी येथील 13 आणि कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमधील 8 लोकांच्या घशातील स्त्रावाचे नमुने पुणे येथील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविण्यात आले होते. आज या 21 अनुमानितांचे अहवाल येणे अपेक्षित होते. मात्र ते आज प्राप्त झाले नाहीत. उद्या या 21 जणांचे अहवाल प्राप्त होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, गिरवी व बनवडी येथे पोलीस व स्थानिक प्रशासानाने मोठी खबरदारी घेत दोन्ही ठिकाणी संचार व जमावबंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करीत दोन्ही गावांची नाकाबंदी केली आहे. या अनुमानितांचे आज अहवाल येणार असल्यामुळे दोन्ही गावांतील नागरिकांनी याकडे चातकाप्रमाणे लक्ष ठेवले होते.
बी.जे. कडे चाचणी स्वॅब पाठविल्याने लागतोय वेळ
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर मुख्यत्वे पुण्यात आणि मुंबईमध्ये याची दाहकता अधिक आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील कोरोना अनुमानितांच्या घशातील स्त्रावांचे नमुने यापूर्वी पुणे येथील एनआयव्ही या संस्थेकडे पाठविले जात असत. एनआयव्ही कडे विविध सांसर्गिक रोगांची चिकित्सा करणारी अद्यावत यंत्रणा व कुशल मनुष्यबळ असल्याने सातार्यातून कोरोना अनुमानितांचे अहवाल पाठविल्यानंतर ते तत्काळ म्हणजे 24 तासांत प्राप्त होत असत. मात्र सातारा व कराड येथील अनुमानितांचे स्वॅब नव्याने तयार करण्यात आलेल्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाकडे चाचणीसाठी पाठविले जात असल्याने याठिकाणी नवीनच सेंटर उभे केल्यामुळे तपासणी अहवाल प्राप्त होण्यास वेळ लागत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |