सातारा : ऐतिहासिक सातारा शहराची तहान भागवणा-या कास धरणाच्या उंचीचे काम सातारा नगरपालिकेच्या देखरेखीखाली सुरु असून धरण उंची प्रकल्पाने वेग घेतला आहे. याच वेगाने काम सूरु राहिल्यास अपेक्षित वेळेत हा महत्वकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास जाईल आणि सातारा शहरासह अवतीभोवतीच्या वाढत्या लोकसंख्येचा पाणी प्रश्न संपुष्टात येईल, असा विश्वास सातारा नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष सुहास आबासाहेब राजेशिर्के यांनी व्यक्त केला. आज कास धरणस्थळी जाऊन त्यांनी प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली. एकूण आढावा घेतला आणि आवश्यक त्या सूचना करत श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांनी 'कास' वचनपूर्तीचा जो ध्यास घेतला आहे त्यासाठी सर्वांनी एकसंघ व सतर्क रहायला हवे, असे आवाहनही केले. या पाहणी दौ-यावेळी स्थायी समिती सदस्य ॲड. डी.जी. बनकर, नगरसेवक ज्ञानेश्वर फरांदे आणि अभियंता पाटील तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.
धरणाच्या पहाणी दौ-यानंतर प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी असे नमूद केले आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये सातारकरांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला खासदार उदयनराजे भोसले यांनी हात घालून ख-या अर्थाने कास धरण उंचीचा पाया रोवला. खासदार उदयनराजे यांची विकासदृष्टी, राजमाता कल्पनाराजे यांचा आशिर्वाद आणि सातारकरांची साथ यातून धरण उंचीचा अत्यंत मूलभूत स्वरुपाचा प्रकल्प साकार होतोय ही तमाम सातारकरांच्या दृष्टीने आनंददायी बाब आहे. या प्रकल्पामुळे सद्यस्थितिपेक्षा पाचपटीने धरणाची पाणी साठवण क्षमता वाढली जाणार आहे. सद्या धरणाचा जलसाठा १०७ दशलक्ष घनफूट आहे. मात्र १२. ४२ मीटरने भिंतीची उंची वाढविल्यानंतर हाच जलसाठा ५०० दशलक्ष घनफूट इतका होणार आहे. सद्या धरणाची उंची १७.१९ मीटर असून ती २९.६१ मीटरपर्यंत वाढविण्यात येणार आहे. यासाठी नदीपात्रात तब्बल ११० फूट खोदकाम करावयाचे आहे. आतापर्यत २०० मीटर लांब, ४० फूट रुंद व ३० फूट खोलीचे खोदकाम पूर्ण झाले आहे. आताची धारणाची लांबी २१८.८५ मीटर असून नवीन धरणाची लांबी ५८०.५० मीटर इतकी होणार आहे. या वाढत्या लांबीमुळे धरण बांधकाम क्षेत्रातील जमीनीवरील असणारे अडथळे दूर करण्याचेही काम सुरु आहे. विद्यूत ट्रांन्सफार्मर, खांब यांचे स्थलांतर करण्यासाठी विद्युत महामंडळाला आवश्यक रक्कम रुपये दिलेली आहे. महामंडळानेही शिप्टींगला सुरुवात करून सहकार्य केले आहे. याशिवाय धरण बांधकामामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचा जो रस्ता बुडीत क्षेत्रात जाणार आहे त्यासाठी पर्यायी रस्ता करावा लागणार आहे. घाटाईदेवी मंदिर मार्गे हा पर्यायी रस्ता असून त्यासाठी १२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
खासदार उदयनराजे भासेले यांच्या विचारसंकल्पनेतील हा महत्वकांक्षी प्रकल्प असून त्यांच्या प्रयत्नांमुळे या प्रकल्पाला मूर्तरुप प्राप्त होत आहे. याशिवाय शहरातील विविध विकास कामेही गती घेत आहेत. वेगवेगळे उपक्रमसुध्दा यशस्वी होत आहेत. आशा पार्श्वभूमीवर नेतृत्वाने सोपवलेली जबाबदारी व दाखवलेला विश्वास हा आम्हाला सार्थ ठरवावयाचा आहे. त्यामुळे पदाच्या प्रेमात जास्त अडकून न पडता छत्रपतींचा सन्मान राखत कार्यमग्न रहाणं खूप आवश्यक आहे. किंबहुना सातारच्या विकासासाठी याच भूमिकेतून सर्वांनी कर्यरत रहायला हवे, अशी भावनाही उपनगराध्यक्ष सुहास आबासाहेब राजेशिर्के यांनी पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |