कराड : स्वच्छ भारत आभियानाच्या धर्तीवर महाराष्ट्र अभियान हा उपक्रम सुरू केला आहे. राज्यातील संपूर्ण नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये स्वच्छ ऑगस्ट क्रांती मोहिम राबविण्याचे शासन निर्देशानुसार मलकापूर नगरपंचायतीमार्फत स्वच्छ ऑगस्ट क्रांती मोहिमेचा शुभारंभ हुतात्मा स्मारक, शास्त्रीनगर, मलकापूर, (ता.कराड) या करण्यात आला.
या बैठकी दरम्यान शहरातील सार्वजनिक स्वच्छता, रस्ते सफाई, दैनंदिनक स्वच्छता इ. स्वच्छतेबाबत उपक्रमावरती जेष्ठ नागरिक व स्वातंत्र्य सैनिक यांचेमार्फत मलकापूर नगरपंचायतीने उत्कृष्ठ कामगीरीबद्दल अभिनंदन व प्लॉस्टिक बंदीबाबत सूचना देणेत आल्या. तसेच मलकापूर नगरपंचायतीमार्फत प्लॉस्टिक बंदी व थ्री स्टार मलकापूर करिता प्रबोधन फेरी काढण्यात आली. प्रबोधन फेरी दरम्यान कालिदास मार्केट, शास्त्रीनगर, रिमांडहोम परिसर या भागात घरोघरी भेटी देऊन थ्री स्टार मलकापूर, प्लॉस्टिकमुक्त मलकापूर, हागणदरीमुक्त शहर हा दर्जा टिकविणे, स्वच्छ सर्व्हेक्षण २०१९ ची सुरूवात यामार्फत करणेत आली. प्रबोधन फेरी दरम्यान नागरिकांनी बुधवार व शनिवार प्लॅस्टिक संकलनाबाबतच्या उपक्रमास सकारात्मरीत्या प्रतिसाद देऊन उपक्रम चांगला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
स्वच्छ ऑगस्ट क्रांती मोहिमेस मलकापूर नगरपंचायत हद्दीतील स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, तरूण मंडळे, बचत महिला, स्वच्छता दूत, शिक्षण, अंगणवाडी सेविका, मलकापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. सुनीता पोळ, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, बांधकाम सभापती राजेंद्र यादव, नियोजन विकास व शिक्षण सभापती शंकर चांदे, नगरसेवक गजेंद्र बुधावले, लक्ष्मण येडगे, सौ. सुनंदा साठे, मुख्याधिकारी संजवीनी दळवी, अधिकारी आत्माराम मोहिते, सौ. प्रिया तारळेकर, सौ. शिल्पा शेटे, रमेश बागल, मल्लिकार्जुन बनसोडे, बाजीराव जाधव, पुंडलिक ढगे व सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. वरीलप्रमाणे संपूर्ण मलकापूर परिसरामध्ये घरोघरी भेट देऊन प्रबोधन करणेस सहभाग नोंदविणेचे सर्वांनी आश्वासन दिले.
फोटो मलकापूर येथे स्वच्छ ऑगस्ट क्रांती मोहिमेचा शुभारंभप्रसंगी सौ. सुनिता पोळ, मनोहर शिंदे, संजीवनी दळवी व इतर मान्यवर.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |