05:28pm | Apr 24, 2018 |
सातारा : सातारा जिल्ह्याच्या सहकाराची मुहूर्तमेढ रोवणार्या युनायटेड बँकेचे नूतनीकरण ज्या बँकेत झाले, त्या आयडीबीआय बँकेच्या गोडोली शाखेतील सहाय्यक व्यवस्थापक पदावर काम करणारे दिव्यांग अधिकारी श्रीकांत पाटील यांना बँकेतील अंतर्गत वादातून तडकाफडकी निलंबनाची ऑर्डर काढण्यात आली. यामुळे तणावाखाली असलेल्या पाटील यांनी आत्महत्त्येचा इशारा दिल्यामुळे शहरात खळबळ माजली आहे. या अधिकार्याच्या कामकाजाबद्दल जवळपास शंभर बँकेच्या ग्राहकांनी त्यांच्यावर आकसाने कारवाई केली असून त्यांना पुन्हा सेवेत दाखल करा, अशा आशयाचे पत्र दिले आहे.
सातारा शहरानजिक असलेल्या जुन्या औद्योगिक वसाहतीमधील गोडोली येथे आयडीबीआय बँकेची शाखा आहे. या शाखेमध्ये सुमारे पाच वर्षांपासून कार्यरत असलेले दिव्यांग श्रीकांत पाटील हे सहाय्यक व्यवस्थापक म्हणून काम करीत आहेत. त्यांची या बँकेतील एका महिला कर्मचार्याशी काही दिवसांपूर्वी वादावादी झाली. त्यानंतर सातत्याने दोघांमध्ये खटके उडत होते. याची तक्रार महिलेने बँकेच्या वरीष्ठ अधिकार्यांकडे केली. त्याची चौकशी न करताच पक्षपातीपणाने पाटील यांच्यावर त्वरित निलंबनाची कारवाई करण्यात आली. मूळचे जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असलेले पाटील यांच्यावर वृद्ध आई-वडीलांची जबाबदारी असून त्यांना या निलंबनामुळे जबरदस्त मानसिक धक्का बसला आहे. याबाबत बँकेच्या ग्राहकांनी सातारा येथील आयडीबीआय बँकेच्या अधिकार्यांशी संपर्क साधला असता, आमच्या हातात आता काही नाही तुम्ही तुमचे म्हणणे मांडा, ते आम्ही वरीष्ठ अधिकार्यांना कळवतो, असे सांगून जबाबदारी झटकली. त्यामुळे पाटील हे आणखीनच खचले आहेत. त्यांनी सातारचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून या प्रकरणी लक्ष घालण्याची मागणी केली आहे. पाटील हे दिव्यांग असल्यामुळे त्यांना इतर कोणतेही कष्टाचे काम होवू शकणार नाही. तसेच बँकेचे वेतन एवढेच त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन आहे. त्यामुळे मदतीसाठी ते सर्वत्र याचना करु लागले आहेत. जो वादविवाद झालेला आहे, त्याबद्दल त्यांनी दिलगीरीसुद्धा व्यक्त केली आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या धोरणानुसार दिव्यांगांना नोकरीमध्ये प्रथम प्राधान्य देण्यात यावे असा अध्यादेश असताना एका दिव्यांगावर क्षुल्लक कारणामुळे झालेला अन्याय अपंग संघटनेपर्यंत पोहोचला आहे. आमदार बच्चु कडू यांची प्रहार संघटना याबाबत जागृत असून त्यांच्यापर्यंत हे प्रकरण पोहोचविण्यासाठी सातार्यातील सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर गायकवाड, बाबा ओव्हाळ व महेश रणखांबे प्रयत्न करीत आहेत. तत्पुर्वी याबाबत सातार्यात बँकेच्या अधिकार्यांशी संपर्क साधला होता. पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |