कराड : तारळे ( ता. पाटण) येथील चौकीचा अंबा नावाच्या चौकात २१ वर्षीय युवकास ताब्यात घेऊन त्याच्याकडून गावठी कट्टा (सिंगल बार) व चार जिवंत काडतुसे हस्तगत केली. शनिवारी पहाटे दीडच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. साहिल रुस्तम शिकलगार (वय-२१ रा. नागठाणे) असे संशयीताचे नाव आहे.
उंब्रज पोलिसांनी दिलेली माहिती अशी, उंब्रज पोलिस ठाण्याचे सपोनि प्रताप भोसले यांना तारळे येथे एक युवक गावठी कट्टा घेऊन येणार असलेची माहिती खबऱ्याकडून मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे उंब्रज पोलिसांनी तारळे येथे सापळा रचला. रात्री १. ३० वा.च्या सुमारास तारळे येथील अंबा चौकात अंधारातून येणाऱ्या युवकाचा पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी त्यास चौकशीसाठी थांबविण्याचा प्रयत्न केला असता सदरचा युवक पळू लागला मात्र त्यास मोठ्या शिताफीने पकडण्यात आले. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे गावठी कट्टा,जिवंत काडतुसे सापडली. बेकायदा गावठी कट्टा जवळ बाळगणाऱ्या युवकास पोलिसांनी ताब्यात घेतले.
यावेळी पोलिसांनी त्याच्याकडून पंधरा हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा तसेच चारशे रुपये किमतीची चार जिवंत काडतुसे जप्त केली. सदरची कारवाई सपोनि प्रताप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक लक्ष्मण जगधने, मयेकर, भुजबळ, फडतरे यांनी केली. संशयितावर नागठाणे, बोरगांव याठिकाणी गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संशयीतास शनिवारी कराड येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |