कराड : भारतात 2015 पासून जागतिक जैवइंधन दिवस साजरा केला जातो. यंदाही दिल्ली येथील विज्ञान भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच जैवइंधन दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्ताने केंद्र सरकारच्या पेट्रोलियम मंत्रालयाच्यावतीने आयोजित राष्ट्रीय परिषदेत य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे 8 ऊसउत्पादक शेतकरी व 2 अधिकारी अशा एकूण 10 जणांनी सहभाग घेतला. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, खाद्यमंत्री रामविलास पासवान, कृषीमंत्री राधामोहन सिंह, विज्ञानमंत्री डॉ. हर्षवर्धन, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, की भारतात दरवर्षी 120 ते 160 दशलक्ष मेट्रीक टन पिकांचे अवशेष व जैविक कचरा उपलब्ध होत असतो. त्यापासून सुमारे 2500 ते 3000 कोटी लिटर इथेनॉल तयार करता येऊ शकते. यामुळे जैविक कचर्याची समस्या तसेच जागतिक तापमानावर होणारा परिणाम कमी होण्यास मदत होणार आहे. आपल्या देशाची इथेनॉलची गरज भागविण्यासाठी औद्योगिक व शहरातील कचर्याचे जैवइंधनात परिवर्तन करणे गरजेचे असून, शेतकर्यांनीही पिकाच्या अवशेषापासून जैवइंधन तयार करण्याचा प्रयत्न करावा.
या राष्ट्रीय परिषदेसाठी कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली 10 जणांची निवड करण्यात आली होती. यामध्ये कारखान्याचे ऊसउत्पादक शेतकरी जयवंत थोरात (कार्वे), विकास साळुंखे (काले), सर्जेराव जाधव (रेठरे बुद्रुक), संजय निकम (शेरे), महादेव गरूड (येणके), अर्जुन कापूरकर (रेठरे बुद्रुक), नामदेव कदम (पेठ), शिवाजी पाटील (तांबवे) यांच्यासह ऊसविकास अधिकारी पंकज पाटील व सहाय्यक ऊसविकास अधिकारी शिवाजी बाबर या समन्वयकांचा समावेश होता.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |