कण्हेर : करंजे मार्गावर सातारा येथे महासैनिक भवन कार्यालयाजवळ सोमवारी पहाटे २ च्या सुमारास भरधाव चारचाकी (एम एच. 11 बी एच - 2175) गाडी चालकाचा ताबा सुटून अपघात झाला. या गाडीचा चालक अथर्व संजय गुंजे (वय २१) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य ४ युवक गंभीर जखमी झाले आहेत.
सातारा शहरानजीक असलेल्या करंजे येथील टीसीपीसी या शासकीय कार्यालयाच्या भिंत व गेटवर ही गाडी जोरदार धडकल्याने गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातातील पाचही युवक यादोगोपाळ पेठ येथील आहेत. यामधील सध्या पुणे येथे शिकत असलेला अथर्व गुंजे हा अपघातात ठार झाला असून, एक गंभीर जखमी आहे. या अपघातात शुभम मोहन खाडे हा युवक गंभीर जखमी, तर तेजस प्रकाश चिपळूणकर (१९), ओम दीपक चिपळूणकर (१५), व निखिल प्रकाश लोहार (२२), हे युवक जखमी झाले आहेत.
दिवाळी सणानिमित्त सुट्टी असल्याने हे सर्व युवक फिरायला गेले असता हा अपघात घडला. रात्री शहरानजीक असलेल्या परिसरातील हॉटेलमध्ये जेवण करून आपल्या चारचाकी गाडीतून घरी निघाले होते. या भरधाव गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने, ही गाडी दुभाजाकला शासकीय कार्यालयाच्या संरक्षण भिंतीवर धडकली. भरधाव गाडीने टीसीपीसी कार्यालयाचे गेट व त्या शेजारील असलेली संरक्षण भिंत तुटल्याने मोठे नुकसान झाले आहे. अपघाताचा गुन्हा शाहूपुरी पोलीस ठाणे येथे नोंद झाला आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |