औरंगाबाद : महाराष्ट्रातून लोकसभा निवडणुकीत युतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर आता विधानसभेची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिवसेना आणि भाजपचा जागावाटपाचा फॉर्म्युलाही निश्चित झाला असून, दोन्ही पक्ष प्रत्येकी 135-135 जागा लढवतील, तर घटक पक्षांसाठी 18 जागा सोडणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
दुष्काळी भागातील कामांचा आढावा घेण्यासाठी महसूल मंत्री पाटील रविवारी औरंगाबादेत आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, शिवसेना-भाजप विधानसभा निवडणुका एकत्रच लढवतील. जागावाटपातील प्राथमिक चर्चा पूर्ण झाली आहे. 288 पैकी 18 जागा घटक पक्षांसाठी सोडण्यात येणार आहेत. उर्वरित 270 जागांबाबत शिवसेना आणि भाजपमध्ये 50-50 चा फॉर्म्युला ठरला आहे.
सेना आमदाराकडून खैरेंचा पराभव
भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या जावयाने नव्हे, तर शिवसेनेच्या माजी आमदारानेच चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला, असा दावा करून पाटील यांनी, खा. दानवे यांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. खा. दानवे यांनी जावई हर्षवर्धन जाधव यांना लोकसभा निवडणुकीत रसद पुरवल्याचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला. जाधव हे शिवसेनेचे आमदार होते. फार पूर्वीच त्यांनी शिवसेनेच्या खैरे यांना थेट आव्हान देत निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, शिवसेनेने जाधव यांची समजूत काढली नाही किंवा त्यांना नियंत्रणातही ठेवले नाही. जाधव यांना पावणेतीन लाख मते मिळाली आहेत. ही मते शिवसेनेचीच होती. त्यामुळे खैरे यांचा पराभव शिवसेनेच्या माजी आमदार जाधव यांनी केला असेच म्हणावे लागेल, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |