RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

आयुर ट्रेडर्स आग प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात जळीताची नोंद

31 August 2018 at 22:21

फलटण : वाठार निंबाळकर ता.फलटण येथील आयुर ट्रेडर्सचे साहित्य ठेवलेल्या जागेत शॉर्ट सर्किटने आग लागली. आगीत लाकूड, पाचट, बगैस, बायोमास ब्रिकेट, आठ चारचाकी वाहने जळून खाक झाले. अंदाजे वीस कोटींहून अधिक रूपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान फलटण ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.  

         फलटण ते पुसेगाव रस्त्यावर वाठार निंबाळकर ता. फलटण हद्दीत स्वराज संघटनेचे अध्यक्ष दिगंबर आगवणे यांची आयुर ट्रेडर्स ही कंपनी आहे. बायोमास ब्रिकेटचा उद्योग असलेल्या सुमारे 20 एकर जागेत लाकूड, बगैस, प्रेसमड, पाचट, लाकडाचा भूसा, ब्रिकेट इत्यादी साहित्य होते. तसेच या जागेतून उच्च दाबाच्या वीज वाहक तारा गेल्या आहेत. मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास शॉर्ट सर्किटने ठिणग्या उडून आग लागली. रात्रभर जास्त वारे असल्याने आग वेगाने पसरली. यावेळी तेथे असणारे कर्मचाऱ्यांनी आग विजवण्याचा प्रयत्न केला. तसेच फलटण पालिकेचा अग्निशमन बंब ही घटनास्थळी आला. मात्र तोपर्यंत आग वेगाने पसरल्यामुळे आयुर ट्रेडर्स मधील कच्च्या मालासह इतर सर्व साहित्य जळून ख़ाक झाले. 

या आगित चार ट्रॅक्टर, दोन ट्रक, एक टेम्पो, टँकर जळून खाक झाले. आगीत अंदाजे वीस कोटींचे नुकसान झालेचा अंदाज आहे. घटनास्थळी कृष्णा खोरेचे माजी उपाध्यक्ष रणजिसिंह नाईक- निंबाळकर, वीज वितरण कंपनीचे अधिकारी, महसूल अधिकारी, पोलीस , काँग्रेस कार्यकर्ते यांनी धाव घेतली होती. आज स्वराज संघटनेचे अध्यक्ष दिगंबर आगवणे यांच्या  वाठार निंबाळकर येथील आयुर ट्रेडर्सला आग लागल्याची माहिती मिळताच तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील हजारो लोकांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान आयुर ट्रेडर्सला लागलेल्या आगीत सर्व जळून खाक झाल्यामुळे कोट्यावधी रुपयाचे नुकसान झाल्यामुळे फलटण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात जळीताची नोंद असून अधिक तपास पोनि. हंकारे करीत आहेत. 

 

जावली तालुक्यातील अवैद्य दारू विक्रेत्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी

गेली ११ वर्ष जावली तालुक्यात सुरु असलेली १३ दारू दुकाने महिलांनी व व्यसनमुक्ती संघटनांनी ऐतिहासिक पाऊल उचलून बंद केली होती.

4 hours before

एकावर पोस्को अंतर्गत गुन्हा

कराड जवळील एका गावात नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

4 hours before

तलावात बुडून युवकाचा मृत्यू

बामणवाडी (ता.कराड) येथे जांभळा नावच्या शिवारात असलेल्या कृषि विभागाच्या पाजर तलावात युवकाचा बुडून मृत्यू झाला.

4 hours before

सातार्‍यातून ट्रॅक्टर, दोन दुचाकी चोरी

सातारा शहर परिसरातून अज्ञात चोरट्यांनी तीन ठिकठिकाणाहून ट्रॅक्टर व दोन दुचाकी चोरुन नेला असून याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल झाले आहेत.

4 hours before