11:56pm | Apr 09, 2020 |
सातारा : निझरे, ता. जावली येथील दोन कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने निझरे व पंचक्रोशीत संचारबंदी कडक करण्यात आली आहे. असे असतानाही निझरेतील दोघेजण टाळेबंदीचे उल्लंघन करुन गावाबाहेर गेल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर न्यायालयासमोर उभे करण्यात आले असता दोघांनाही तीन हजाराच्या दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोरोना (कोविड-19) या विषाणू प्रादुर्भावाच्या अनुषंगाने संपूर्ण देशभरात दि. 22 मार्च पासून टाळेबंदी (लॉक डाऊन) जाहीर करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा सोडल्यास सर्वांनाच इतर कामासाठी घराबाहेर पडता येणार नाही, असा जमाव व संचारबंदीचा आदेश सातारा जिल्हाधिकार्यांनी पारित केला होता. असे असताना निझरे, ता. जावली येथील दोन कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने निझरे तसेच पंचक्रोशीतील परिसरात जमाव व संचारबंदी कडक करण्यात आली होती. संचारबंदी असतानाही निझरे येथील दत्तात्रय धोंडिराम वाडकर व शुभम दत्तात्रय वाडकर हे दोघेजण व्यक्तिगत कामासाठी गावाबाहेर गेले होते. त्यांची ही बेकायदेशीर कृती जावली तहसिलदार शरद पाटील यांना समजल्यानंतर त्यांनी तत्काळ याबाबत मेढा पोलीस ठाण्यात दोघांवरही कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. यानंतर या दोघांविरोधात मेढा पोलीस ठाण्यात भादंवि 188 नुसार गुन्हा दाखल झाला. मेढा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकार्यांसमोर या दोघांना उभे केले असता न्यायालयाने त्यांना 3 हजारांचा दंड ठोठावला. दरम्यान, जावली तालुक्यात संचारबंदी असताना मुंबई, पुणे अथवा इतर कोणत्याही जिल्ह्यातून एखादी व्यक्ती विनापरवाना तालुक्यात प्रवेश करताना आढळून आली तर त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करुन गुन्हे दाखल केले जातील, अशी माहिती जावली तहसिलदार शरद पाटील यांनी दिली आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |