कराड : राज्याच्या वन्यजीव विभागाचे मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांनी रविवारी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पास भेट देऊन पाहणी केली. सांगलीचे मानद वन्यजीव रक्षक पापा पाटील यांनी त्यांचे कोयनानगर (ता. पाटण) येथे स्वागत केले. यावेळी वन्यजीव विभागाच्या उपसंचालक विनीता व्यास, सह्याद्रि व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक सत्यजित गुजर, वनक्षेत्रपाल शिंदे, रोहन भाटे, नाना खामकर, हेमंत केंजळे, अजित पाटील उपस्थित होते.
नितीन काकोडकर यांनी कोयना अभयारण्यातून वगळण्यात येणार्या 14 गावांची पाहणी करून माहिती घेतली. तसेच अभयारण्यातून 14 गावे वगळण्याबाबतचा अध्यादेश शासन लवकरच काढणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या मुख्य वनसंरक्षकांनी दिलेली भेट महत्वाची मानली जात आहे. दरम्यान, कोयना धरणात बोटींग लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. वनरक्षकांना गस्तीसाठी जलाशयातून जावे लागते. त्यासाठी पाण्यावर चालणारी स्कूटर बोट उपलब्ध करून द्यावी. बफर झोनमध्ये पर्यटनवाढीसाठी वन्यजीव खात्याने प्रयन्त करावेत, बफर झोनमधील जमिनीच्या एनएसाठी तहसीलदार वनविभागाचा ना हरकत दाखला मागतात. तशा दाखल्याची मागणी न करण्याबाबत महसूल विभागाला सूचित करावे, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. सर्व मागण्यांचा सकारात्मकदृष्ट्या विचार करून प्रशासकीय पातळीवर लवकरच निर्णय घेऊ, अशी ग्वाही काकोडकर यांनी दिली. विचार करून लवकरच निर्णय घेतले जातील असे आश्वासन नितीन काकोडकर यांनी दिले.
सह्याद्री व्याघ्र प्रक वन मजुरांना वर्षभर राबवून घेऊनही त्यांना वेतन दिलेले नाही. विशेष म्हणजे कोल्हापूर येथील क्षेत्र संचालक कार्यालयाने वन मजूर वेतन कराड उपसंचालक कार्यालयास वर्ग केल्याचे समजते. मात्र, वन मजुरांना प्रत्यक्षात वेतन दिले गेलेले नाही. उपसंचालक कार्यालयाकडून अॅडव्हान्समध्ये वेतन मिळाले म्हणून वन मजुरांच्या व्हॉवचरवर सह्या घेण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे. तथापि, त्यांना वेतन मात्र दिले गेलेले नाही. याबाबत वृत्तपत्रात बातम्या प्रसिध्द झाल्यानंतर वन्यजीव विभागात खळबळ उडाली होती. याबाबत वन्यजीव विभागाचे मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांनी रविवारी दिलेल्या भेटीवेळी त्याबाबतची माहिती घेतल्याचे समजते. आता काकोडकर कोणते पाऊल उचलणार, याबद्दल वन्यजीव विभागात आणि वन मजुरांमध्ये उत्सुकता आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |