बेंगळुरू : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि अंडर १९ संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड, बॅडमिंटनपटू सायना नेहवाल या दोघांसह अनेक सेलिब्रिटींना बेंगळुरूतील एका गुंतवणूक कंपनीनं कोट्यवधींचा गंडा घातला आहे. द्रविड आणि सायनाने या कंपनीत कोट्यवधी रुपये गुंतवले आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, द्रविड आणि त्याच्या कुटुंबीयांनी 'विक्रम इन्व्हेस्टमेंट' या कंपनीत जवळपास ३५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. त्यातील २० कोटी रुपये एकट्या द्रविडचे होते. सायना नेहवालनेही दीड कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. त्यातील ७५ लाख रुपये तिला परत मिळाले होते. या दोघांव्यतिरिक्त कर्नाटकचे माजी क्रिकेटपटू अविनाश वैद्य यांच्यासह १,७७६ जणांनी या कंपनीत पैसे गुंतवले होते. वर्षाला २५ ते ३० टक्के परतावा देण्याचे प्रलोभन गुंतवणुकदारांना दिले होते. फसवणूक करणाऱ्या कंपनीविरोधात सोमवारपर्यंत ६६ तक्रारी, तर मंगळवारपर्यंत जवळपास १६६ जणांनी शहरातील विविध पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. अद्याप कोणत्याही सेलिब्रिटी व्यक्तीने कंपनीविरोधात तक्रार दाखल केलेली नाही. कंपनीचा संस्थापक राघवेंद्र श्रीनाथ आणि व्यवस्थापक सुतराम सुरेश यांच्या चौकशीत या सेलिब्रिटींची नावे समोर आली आहेत, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |