12:37am | Jan 14, 2020 |
सातारा : भारत देशाची अस्मिता हि तिरंगा ध्वजामध्ये आहे. देशासाठी त्याग करणारे जवान व अति महत्वाच्या व्यक्तिंना त्यांच्या जीवनाच्या अंतिम प्रवासामध्ये तिरंगा ध्वजामध्ये गुंडाळले जाते. याच तिरंगा ध्वजाचे महत्व खुप मोठे आहे. दररोज सकाळी वेळेला तसेच स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनी आणि युनोच्या स्थापनेदिवशी हा तिरंगा ध्वज संपुर्णपणे फडकवला जातो. पण जेव्हा राष्ट्रीय आपत्ती, किंवा महनीय व्यक्तिचे निधन पावल्यानंतर तिरंगा ध्वज अर्ध्यावर आणला जातो. मात्र आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात तिरंगा ध्वज अर्ध्यांवर उतरवल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.
याबाबत माहिती अशी कि, नवी दिल्ली येथील गृह विभागाने वायरलेस मेसेज द्बारे सर्व राज्यातील मुख्यसचिव व केंद्रशासित प्रदेशातील गव्हर्नर यांना 12 जानेवारी रोजी आदेशा द्बारे तिरंगा ध्वज अर्ध्यांवरती आणण्याचा आदेश दिलेला आहे. मॅजेस्टी सुलतान कुब्बोस बिन सईद अल सईद या ओमनच्या सुलतानाच्या निधनानिमीत्त त्यांना अभिवादन करण्यासाठी एक दिवस तिरंगा ध्वज अर्ध्यावरती फडकवण्याचा आदेश दिला आहे. या आदेशाची अंमलबजावणी म्हणून आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील तिरंगाध्वज अर्ध्यावरच फडकवण्यात आला होता. आज जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी जिल्हा नियोजनात शासकिय बैठक घेतली होती. या बैठकीला जिल्ह्यातून अधिकारी लोकप्रतिनिधी, प्रसार माध्यमांचे प्रमुख उपस्थित होते. त्यांनीही या तिरंग्या ध्वजाबाबत विचारणा केली. त्यानंतर नेमके कारण समजल्यामुळे अनेकांनी सुलतानला अभिवादन करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |