12:28am | Aug 22, 2019 |
सातारा : तीन वर्षांपुर्वी झालेल्या वादाच्या कारणावरुन खेड येथील वनवासवाडी परिसरात राहणार्या अमीर सलीम शेख (वय 17) याचे मंगळवारी दुपारी अपहरण करत त्याला झाडास बांधून गंभीर स्वरुपाची मारहाण केली. याप्रकरणी सदरबझार मधील 16 युवकांवर मंगळवारी रात्री सातारा शहर पोलीस ठाण्यात अपहरण, जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
वनवासवाडी येथे अमीर शेख हा राहण्यास असून तो महाविद्यालयात शिकत आहे. मंगळवारी सकाळी तो दुचाकीवरुन एका मित्रासमवेत राजपथावरील एलआयसी परिसरात आला होता. याठिकाणाहून तो पुन्हा सदरबझारकडे निघाला होता. यावेळी त्याला मनिष विश्वकर्मा, शुभम (पुर्ण नाव नाही) व इतर युवकांनी दुचाकीवरुन पाठलाग करुन अडवले. याठिकाणी अमीर शेख व त्याच्या मित्राला तीन वर्षांपुर्वी झालेल्या वादाच्या कारणावरुन दमदाटी करत जबरदस्तीने दुसर्या दुचाकीवर बसण्यास भाग पाडले.
यानंतर त्यांना दुचाकीवरुन सदरबझार येथील कॅनॉल जवळ असणार्या दर्गा परिसरात नेण्यात आले. याठिकाणी मनिष विश्वकर्मा व त्याच्यासोबत असणार्यांनी फोन करुन इतर साथीदारांना बोलावून घेतले. साथीदार आल्यानंतर विश्वकर्मा व इतरांनी अमीर शेख व इतरांना मारहाण करण्यास सुरुवात केली. युवकांचे टोळके मारहाण करत असल्याचे पाहून त्याठिकाणच्या रस्त्यावर नागरिकांची गर्दी जमली. यामुळे विश्वकर्मा व इतरांनी अमीर शेख, शुभम बागवडे, अभिजीत भिसे यांना त्याच परिसरातील आंब्याच्या बागेत नेले. त्याठिकाणच्या झाडास अमील शेखला बांधून पुन्हा मारहाण करण्यात आली.
मारहाण करणार्या विश्वकर्मा व त्याच्या साथीदारांनी यावेळी शेखच्या खिशातील पाचशे रुपये काढून घेतले. तीन तास त्या युवकांकडून शेख व त्याच्या मित्रांना मारहाण सुरु होती. नागरिकांचा वावर वाढल्याने मारहाण करणार्यांनी नंतर त्याठिकाणाहून पळ काढला.यानंतर शेख व इतरजण उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाले. शेख याने दिलेल्या फिर्यादीनुसार मनिष विश्वकर्मा, शुभम, शिवम रजपूत, उमेश गायकवाड, अमित सोळंकी, पुया (पुर्ण नाव नाही) यांच्यासह सुमारे 16 जणांवर खुनाचा प्रयत्न, अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याचा तपास सहाय्यक निरीक्षक बाजीराव ढेकळे हे करीत आहेत.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |