फलटण : अलगुडवाडी (ता. फलटण) करंज ओढ्यातून अवैध वाळू उपसा करणार्या वाळू व्यावसायिकांना पोलिसांनी अडवून चौकशी केली असता व्यावसायिकांनी पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली आहे. अलगुडवाडी येथील करंज ओढ्यात गुरुवारी अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक पवन बनसोड यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी तत्काळ फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक कारवाईसाठी पाठवले. हे पथक घटनास्थळी पोहोचले. मात्र, याची वाळू व्यवसायिकांना चाहूल लागली. यानंतर वाळू भरलेल्या ट्रॅक्टर व ट्रॉली जवळील 5 ते 6 जणांनी पोलिसांना दगड मारण्यास सुरूवात केली.
त्यानंतर ट्रॅक्टरमधून बसून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सहाय्यक फौजदार रासकर व हवालदार भोसले यांनी हा ट्रॅक्टर अडवला असता चालकाने त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यानंतर ते तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले. हा प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी एक जादा कुमक मागवून जेसीबी व ट्रॅक्टर ताब्यात घेतला. यावेळी संशयित अक्षय नवनाथ करचे (वय 22) काळूराम गोरख गुंजाळ (वय 24) व एक अल्पवयीन मुलगा (सर्व रा. अलगुडवाडी) यांना अटक केली आहे. ताब्यात घेतलेल्या संशयितांकडून पसार झालेल्यांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. त्यांच्या शोधासाठी विविध ठिकाणी पथके रवाना करण्यात आली आहेत. तपास पोलिस उपनिरीक्षक आर.आर. भोसले करत आहेत.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |