03:45am | Jan 28, 2020 |
कराड : ओगलेवाडी (ता.कराड) येथे शनिवारी सायंकाळी खुन्नसने बघण्यावरून झालेल्या भांडणात धारदार शस्त्राने भोसकून 22 वर्षांच्या युवकाचा खून करण्यात आला. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली असून यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आले. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या संशयितांना बुधवार दि.29 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
नरेंद्र अनिल कदम (रा. हजारमाची, ता. कराड) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी कुणाल सुभाष पळसे, शिवम शैलेंद्र आंबेकर, सागर सुखदेव पळसे, सचिन कृष्णात पळसे व दोन अल्पवयीन मुले (सर्व रा.ओगलेवाडी) असे अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
एकमेकांकडे खुन्नसने बघण्यावरून मृत नरेंद्र कदम व अन्य एका युवकामध्ये ओगलेवाडी येथे शनिवारी सकाळी वादावादी झाली होती. हा वाद सामोपचाराने मिटविण्यात आला होता. परंतु, सायंकाळी पाच वाजता पुन्हा त्यांच्यात भांडण झाले. या भांडणात नरेंद्र कदम यास एकाने धारदार शस्त्राने भोसकले. शस्त्राचा वार वर्मी लागल्यामुळे नरेंद्र हा जागीच ठार झाला. घटनास्थळी मोठा जमाव जमला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नरेंद्रला जमावातील काही युवकांनी कराडच्या सौ. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात आणले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. खुनाच्या घटनेमुळे ओगलेवाडीत तणाव निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस फौजफाट्यासह ओगलेवाडीत दाखल झाले.
या खूनप्रकरणी कराड शहर पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. अटक करण्यात आलेल्या संशयितांना आज (सोमवारी) कराड न्यायालयात हजर केले असता. त्यांना तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |