सातारा : शिवशाही बसचे अनेक कारणामे उघड होत असतानाच त्यावरील एका चालकाने चक्क मद्यप्राशन करुन बस चालवल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेने डेपोसह प्रवाशांमध्ये खळबळ उडाली असून शिवशाही बसचा प्रवास रामभरोसे सुरु असल्याचेच आता स्पष्ट झाले आहे.
दत्तात्रय बाळकृष्ण कदम (वय 34, रा.सायगाव) या चालकावर गुन्हा दाखल झाला असून याप्रकरणी राहूल श्रीरंग शिंगाडे यांनी तक्रार दिली आहेे. ते सातारा बसस्थानक प्रमुख आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार हे बसस्थानकामध्ये पाहणी करत असताना सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास शिवशाही बस क्रमांक (एम.एच. 14 बीजी 1644) पुणेहून सातार्यात आली. तक्रारदार शिंगाडे यांनी चालकाला वाहन चालवण्याचा परवाना, गाडीचे कागदपत्रे मागितली व चालकाला त्याचे नाव विचारले. यावेळी चालक नाव सांगत असताना अडखळला. याचवेळी त्याच्या तोंडातून दारुसारखा उग्र वास आला.
यावेळी शिवशाही बसचालक दत्तात्रय कदम याला बसस्थानकामध्ये नेण्यात आले. तेथे त्याला मद्य सेवन केल्याबाबत विचारले असता त्याने मद्यसेवन केले असल्याची कबुली दिली. यावेळी चालकाने तसे लेखीही लिहून दिले. दरम्यान, वरिष्ठ अधिकार्यांशी बोलणे झाल्यानंतर याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तक्रारही देण्यात आली. ही सर्व घटना दि. 16 रोजी घडली आहे. शिवशाही बस चालकांबाबत अनेकदा तक्रारी होत असल्याचे वास्तव आहे. अशातच सातारा शहर पोलिस ठाण्यात यावरील चालकावर दारु पिवून एसटी चालवल्याचा गुन्हा दाखल झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |