सातारा : शहरातील सार्वजिनक शौचालयात अल्पवयीन मुलगी गेल्यानंतर एका अज्ञात नराधमाने आतमध्ये जावून दाराची कडी लावून मुलीचा विनयभंग केल्याची केल्याची धक्कादायक घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. सार्वजनिक शौचालयात ही घटना घडल्याने महिला व मुलींमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुध्द पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणाची तक्रार अल्पवयीन मुलीच्या आईने दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 2 रोजी सकाळी केसरकर पेठ येथे 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी सार्वजनिक शौचालयामध्ये गेली होती. मुलगी शौचालयाचा दरवाजा ओढून लावत असतानाच एक अनोळखी पुरुष त्या सार्वजनिक शौचालयाजवळ गेला व ज्याठिकाणी मुलगी गेली होती त्या दरवाजातून आत गेला. अज्ञात व्यक्ती अचानक महिलांच्या सार्वजनिक शौचालयात आल्याने त्या मुलीने आरडाओरडा करत मदत मागण्याचा प्रयत्न केला.
दरम्यानच्या काळात संबंधित संशयिताने मुलीचा विनयभंग केला. मोठ्याने आरडाओरडा झाल्याने संशयिताने घटनास्थळावरुन पलायन केले. या घटनेने संबंधित मुलगी कमालीची घाबरली. घरामध्ये आल्यानंतर तिने घडलेल्या घटनेबाबत कुटुंयिबांना माहिती दिली. मुलीने सांगितलेल्या माहितीनंतर कुटुंबिय हादरुन गेले. अखेर मंगळवारी रात्री याप्रकरणी मुलीच्या आईने घडलेल्या घटनेबाबत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार अधिनियम अंतर्गत गुन्ह दाखल केला आहे.
पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर महिला फौजदार वंजारी पुढील तपास करत आहेत. दरम्यान, गजबजलेल्या परिसरात अशाप्रकारचे कृत्य झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |