सातारा : शिवथर ता. सातारा येथील एका धाब्यावर दत्तात्रय प्रकाश जाधव (मूळ रा. मालगाव ता. सातारा सध्या रा. वाठार स्टे. ता. कोरेगाव) याच्याकडून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने गावठी पिस्टल जप्त केले. त्याची किंमत 50 हजार रुपये असून पोलिसांनी एक राउंडही जप्त केला आहे. दरम्यान, संशयित हा माजी ग्रामपंचायत सदस्य असून सध्या वडापाव विक्रीचा व्यवसाय करत असल्याचे समोर आले आहे.
याबाबत प्राथमिक माहिती अशी, दत्तात्रय जाधव यांच्याकडे पिस्टल असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली. त्यानुसार गुरुवारी पोलिसांनी सापळा रचला व पथक तैनात केले. संशयित पोलिसांना दिसल्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिस अंगझडती घेतली असता त्याच्याकडे पिस्टल सापडले. अधिक चौकशी केली असता त्याच्याकडे एक राउंडही सापडला.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन त्याला ताब्यात घेतले. एलसीबीच्या विभागात आणून चौकशी केल्यानंतर तो वाठार स्टेशन ग्रामपंचायतीचा माजी ग्रामपंचायत सदस्य असल्याचे समोर आले. सध्या मात्र वाठार येथे वडापाव विक्रीचा व्यवसाय करत असल्याचे त्याने सांगितले. तसेच उत्तरप्रदेश येथील मुन्ना नामक व्यक्तीची त्याची ओळख झाली होती व त्यानेच हे घातक शस्त्र दिले असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, पोलिस सर्व बाजूने तपास करत आहेत.
जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार, पोनि पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सागर गवसने, पोलीस हवालदार विलास नागे, योगेश पोळ, संतोष जाधव, नितीन भोसले, राजकुमार ननावरे, प्रवीण कडव, गणेश कचरे, संजय पवार, ज्योतीराम बर्गे, मधुकर गुरव, मोहन नाचण, रवि वाघमारे, मारुती अडागळे यांनी कारवाईत सहभाग घेतला.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |