सातारा : बँकेतून 1 लाख रुपये काढल्यानंतर त्यातील सुमारे 50 हजार रुपयांचे दागिने इन्शुरन्स कंपनीतून सोडवून घरी जात असताना अवघ्या पाच मिनिटांमध्ये अज्ञात चोरट्यांनी दुचाकीच्या डिकीतून रोख 42 हजार रुपयांसह तब्बल 1 लाख रुपये किंमतीचे दागिने चोरुन नेल्याने खळबळ उडाली आहे. गुरुवारी दुपारी देगाव फाटा येथे ही घटना घडली असून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सौ.शोभा शिवाजी भोसले (रा.कारंडवाडी ता.सातारा) यांनी याबाबतची तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 21 रोजी दुपारी तक्रारदार यांनी बँकेतून 1 लाख रुपयांची रक्कम काढली. त्यानंतर गहाण ठेवलेले सुमारे 50 हजार रुपये देवून दागिने सोडवले. सातार्यातील ही कामे झाल्यानंतर तक्रारदार या दुचाकीवरुन देगावकडे निघाल्या होत्या. देगाव फाटा येथे आल्यानंतर मात्र घरामध्ये मुलांना खावू घेण्यासाठी त्या दुचाकी पार्क करुन गेल्या. याच संधीचा गैरफायदा घेवून अज्ञात चोरट्याने दुचाकीच्या डिकीतील रोख रकमेसह सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला.
तक्रारदार महिला दुकानातून आल्यानंतर डिकीतील पैसे व दागिन्यांची बॅग नसल्याचे लक्षात आले. या घटनेने त्या घाबरल्या परिसरात सर्वत्र शोध घेतला मात्र बॅग सापडली नाही. अखेर अज्ञाताने चोरी केली असल्याचे समोर आल्यानंतर शहर पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |

तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |