सातारा : बँकेचा मॅनेजर बोलतोय असे सांगून मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांक मागवून खात्यातील 50 हजार रुपये चोरल्याची घटना घडली. सातारा सायबर सेल पोलिसांनी तांत्रिक सहाय्याच्या मदतीने तत्काळ गतीमान तपास करुन तक्रारदाराचे 25 हजार रुपये मिळवून दिले. दरम्यान, तक्रारदार यांनी ओटीपी क्रमांक शेअर केल्याने त्यांची फसवणूक झाली असून ‘ओटीपी’ क्रमांक कोणालाही देवू नये, असे आवाहन सातारा पोलिसांकडून करण्यात आले आहे.
विलास भानुदास काटकर (रा.काटकरवाडी, पुसेगाव ता.खटाव) यांनी याबाबतची तक्रार दिली होती. काटकर यांना अज्ञाताने फोन करुन ‘बँकेतील मॅनेजर बोलत असल्याचे सांगितले.’ तसे सांगून मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांक देण्यास सांगितल्यानंतर काटकर यांनी तो दिला. याचा गैरफायदा घेऊन अज्ञाताने तक्रारदार काटकर यांच्या बँकेच्या खात्यातील ४४ हजार ९९८ रुपये फसवणूक करुन चोरले.
बँकेच्या खात्यावरील पैसे गेल्याचा मेसेज तक्रारदार काटकर यांना आल्यानंतर त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तत्काळ त्यांनी सातारा सायबर सेल पोलीस ठाण्याशी संपर्क साधल्यानंतर पोलिसांनी तपास करुन तक्रारदार काटकर यांचे 24 हजार 999 रुपये मिळवून दिले. सपोनि गजानन कदम, पोलिस हवालदार विक्रांत फडतरे, अमित झेंडे, अजय जाधव यांनी याचा तपास केला.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |