कराड : बंदी असतानाही गणेशोत्सवात डीजे लावणार्यांवर पोलिसांनी कारवाईची धडाका सुरू केला आहे. कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यात डीजे वाजू देणार नसल्याची भूमिका पोलिसांनी घेतली असून, आतापर्यंत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कराड तालुक्यात तब्बल ३५ डीजेंवर कारवाई केली आहे. यापुढेही डीजेचा वापर करणार्या मंडळांबरोबरच डीजे मालकांवरही कारवाई करणार असल्याचा इशारा डीवायएसपी नवनाथ ढवळे यांनी दिला आहे.
न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्ह्यात डीजेला परवानगी दिली जाणार नसल्याची भूमिका पोलिसांनी घेतली आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या दहीहंडी कार्यक्रमावेळीही पोलिसांनी दोन डीजेंवर कारवाई केली होती. त्यावेळी डीजेला परवानगी मिळावी म्हणून अनेकांनी पोलिसांवर राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याला बळी न पडता डीवायएसपी नवनाथ ढवळे यांच्यासह पोलिस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी डीजेला परवानगी दिली जाणार नाही, लावल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्यावेळी गणेशोत्सवात काय करणार? असा प्रतिप्रश्न पोलिसांना केला होता. डीजेला बंदी असल्याने त्यावेळी देखील आम्ही परवानगी देणार नसल्याचे पोलिसांनी सांगितले होते.
पोलिसांच्या भुमिकेमुळे बंदी असताना गणेशोत्सवात डीजे वाजणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. त्यातच खा.श्री.छ. उदयनराजे भोसले यांनी डीजे वाजणारच! असे जाहीर वक्तव्य करून पोलिसांना आव्हान दिले होते. परंतु, आयजी विश्वास नांगरे-पाटील यांनी सातारमध्ये येऊन डीजे विरोधात रॅली काढली. तसेच डीजे वाजणार्यांवर कारवाईचा इशारा दिला होता. वरिष्ठांनी घेतलेल्या भुमिकेमुळे कराड तालुक्यातही पोलिसांनी डीजेला बंदी घातली आहे. बंदी असतानाही डीजे लावणार्यांवर कारवाई करण्याचा धडाका पोलिसांनी लावला आहे.
गणरायाच्या आमगनापासून आजपर्यंत गणेशोत्सवात ३५ डीजेंवर पोलिसांनी कारवाई केली आहे. ही कारवाई करताना त्यांनी कोठेही डीजेचा आवाज येवू दिला नाही. विसर्जन मिरवणुकीतही डीजेला बंदी असून कोणी वाजविण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही डीवायएसपी नवनाथ ढवळे यांनी दिला आहे.
उंब्रज पोलिस ठाण्यांतर्गतही कारवाईचा धडाका..
उंब्रज पोलिस ठाण्याच्या वतीने यावर्षी गणेशोत्सव काळात गणेश मंडळांना कडक नियमावलींची अमलंबजावणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, काही मंडळांनी या नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्याने पोलिसांनी तारळे, चाफळ, मसूर परिसरातील गावांमध्ये डीजे सीलबंद केले. यात वडगाव, तारळे, घोट, वेखंडवाडी, ढोरोशी, सावरवाडी, मरळी, साबळेवाडी, शामगाव, कडववाडी (नानेगाव), सूर्याचीवाडी (नानेगाव), आदर्शनगर, कालगाव, मसूर, खोडजाईवाडी येथील सुमारे 21 डीजेचा समावेश आहे.
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |