12:34am | Aug 26, 2018 |
कराड : नगरपालिकेच्या संकलित कर वसुलीसाठी असणारी झोन पध्दतच मुळात चुकीची आहे. त्यात मोठा घोळ असून ती मिळकतदारांवर अन्याय करणारी आहे. त्यामुळे पालिकेने संकलित कर झोन व वसुली पध्दतीची पुर्नरचना करावी. यासाठी तातडीने विशेष सभा बोलवावी. अन्यथा याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागणार असून वेळप्रसंगी या विरोधात तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला.
कराड नगरपलिका कर प्रश्नावर लोकशाही आघाडीची भुमिका स्पष्ट करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगरसेवक मोहसीन आंबेकरी, वैभव हिंगमिरे, सुहास पवार, शिवाजी पवार, अनिता पवार उपस्थित होत्या.
सौरभ पाटील म्हणाले, कराड नगरपालिकेला मिळकतींच्या माध्यामातून मिळणाऱ्या कर वसुलीसाठी पालिकेने संकलित कर झोन तयार केला आहे. या झोनच्या माध्यमातून पालिका कर वसुली करते. या करामध्ये चार वर्षांनी वाढ केली जाते. ती सर्वसाधारण शुन्य ते पन्नास टक्के करण्याची कायदेशीर तरतुद आहे. मात्र, या तरतुदीनुसार किती टक्के वाढ करायची ते सर्व अधिकार पालिकेला आहेत, असे असतानाही सध्या १०० ते १५० टक्के वाढ करण्यात आली आहे.
ते म्हणाले, याबाबत तातडीने नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील व मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्याकडे तक्रार केली आहे. ही कर वाढ पुर्णपणे चुकीची व अन्यायकारक असल्याचे सांगण्यात आले आहे. कर वसुलीसाठी करण्यात आलेली झोन पध्दत चुकीची आहे. त्यामुळे कर वसुलीची सदरची नोटीस तातडीने थांबवण्यात यावी, अशी मागणीही केली आहे. मात्र, या मागणीची कोणतही दखल न घेतात नोटीस देण्याचे काम सुरूच आहे. शिवाय मुख्याधिकारी डांगे यांनी तांत्रिक कारण सांगत नागरिकांनी यावर अपिलामध्ये जावे, असे सांगितले आहे. मुळातच कर संकलित झोन व वसुली पध्दत चुकीचीच असून सर्वमावेशक नाही. रहिवाशी आणि व्यवसायीक कर वसुली व झोन मधील त्रुटींचा मोठा आर्थिक फटाका नागरिकांना बसणार आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाच्या चुकीच्या पध्दतीने होणाऱ्या कर वसुलीची झळ नागरिकांनी का सोसायची? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या प्रक्रियेला नागरिकांसह लोकशाही आघाडीचा विरोध असल्याचे सौरभ पाटील यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले, कराड पालिकेच्या कर संकलित झोन व वसुली पध्दतीची तातडीने पुर्नरचना करावी. ती करत असताना त्याची माहिती सर्व नगरसेवक पदाधिकारी, नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षांसह नोटीस बोर्डावर प्रसिध्द करावी. सध्या सुरू असणारी कर वसुली प्रक्रिया रद्द करण्यासाठी तातडीने विशेष सभा बोलवावी. अन्यथा याप्रकरणी जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागणार असून वेळप्रसंगी तीव्र आंदोलन करणार असल्याचे सौरभ पाटील यांनी सांगितले.
मुख्याधिकाऱ्यांना चूक मान्य
कराड पलिकेकडून सध्या मिळकत कर वसुलीसाठी नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र संबंधित शासनाच्या एजन्सीकडून सव्र्हे चुकीचा झाला आहे. ही चूक प्रशासनाची असल्याचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी सांगितले आहे. नागरिकांनी याप्रकरणी अपिलात जाण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे. चूक प्रशासनाची आहे तर नागरिकांना त्याचा त्रास का? कर संकलित झोन व वसुली पध्दतच चुकीची असल्याने अपिल हा पर्याय आम्हाला मान्य नसल्याचे सौरभ पाटील यांनी स्पष्ट केले.
झोन मध्येच गोलमाल
कराड पालिकेने मिळकतदारांचा कर वसुली करण्यासाठी कर संकलित झोन तयार केली आहे. यात काही ठिकाणाचा सोईस्कर रित्या काही भाग टाळण्यात आला आहे. तर मुख्य बाजारपेठेच्या दोनही बाजूला वेगळा दर, अंतर्गत वेगळा दर आणि त्यातही तफावत आहे. ग्रामीण झोन तयार करताना सरसकट तयार करण्यात आला आहे. यात कोणत्याही प्रकारचे रस्त्याचा समावेश अथवा ते ग्राह्य धरण्यात आले नाहीत. तसेच दरांची मोठी तफावत असल्याचे सौरभ पाटील यांनी सांगितले.
झोन अभ्यासासाठी जिल्हादौरा
कराड नगरपालिकेने २०१९च्या स्वच्छ सर्वेक्षणासाठी नुकताच इंदोर अभ्यास दौरा केला. त्याधर्तीवर कराडमध्ये कर संकलित झोनमध्ये निर्माण झालेल्या त्रुटींच्या पार्श्चभुमीवर राज्यातील कर प्रकरणी झोनची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या पालिकांचा आपण अभ्यास दौरा करणार का? या प्रश्नावर बोलताना सौरभ पाटील म्हणाले, आम्ही पालिकेत येऊन लगभग दीड वर्ष झाली आहेत. आम्ही अजून अभ्यास करतोय. पालिका कामकाजाची माहिती घेतो. मात्र, शहर वाशीयांसाठी निर्माण झालेल्या या झोन प्रश्नावर सार्वत्रिक माहिती घेण्यासाठी राज्यात नाही तर जिल्ह्यातील पालिकांचा दौरा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |